Hyundai i20 Turbo DCT Automatic review: जाणून घ्या का खरेदी करायची नवीन Hyundai i20?
मोठ्या स्पेससोबत चांगला लूक आणि चांगला परफॉरमन्स असे काही वैशिष्ट्ये असलेली ही कार कॉम्पॅक्ट एसयूवीपेक्षा चांगला पर्याय आहे.
नवी दिल्ली: आपण काही दिवसांपूर्वीच Hyundai i20 च्या फर्स्ट लूकची चर्चा केली होती. आता आपण या कारच्या परफॉर्मन्सबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही नवीन i20 कारच्या 1.2l इंजिनच्या दोन्ही प्रकारचा अनुभव घेतला आहे. यामध्ये Turbo i20 च्या इंजिनची शक्ती तशीत किंमतही जास्त आहे. आम्ही ही कार शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच मोकळ्या रस्त्यावरही चालवली. पहिला आपण i20 Turbo बद्दल चर्चा करुयात. ही सर्वात पॉवरफुल i20 आहे. 120 bhp आणि 172Nm या प्रकारातील 1.0 टर्बो इंजिनमुळे याची शक्ती अजून वाढते. तुम्ही Turbo i20 ही iMT गिअर बॉक्समध्ये किंवा 7-स्पीड ड्यूएल क्लच ऑटोमॅटिक मध्ये घेऊ शकता.
बाहेरुन निरीक्षण केले असता i20 कार ही वास्तवात खूप मोठी दिसते. या आधीच्या कारच्या तुलनेत i20 ही हॅचबॅक पेक्षा निश्चितच मोठी दिसते. याचा आकार कॉम्पॅक्ट एसयुव्हीशी मिळता-जुळता आहे. याची ग्रील मोठी पण चांगल्या पध्दतीने लॉंग हॅंडलॅम्पशी जोडलेले आहे. ही कार काळ्या किंवा लाल रंगातील ड्यूएल टोन एलॉइज मुळे निश्चितपणे आकर्षक दिसते.
नवीन i20 ची किंमत थोडी जास्त आहे यात काही शंका नाही. 11 लाख किंमत असलेल्या ही कार तुलनेने महाग आहे. काही हार्ड प्लास्टिक व्यतिरिक्त क्वॉलिटी आणि सामान्य फिट, फिनिश हॅचबॅकसाठी एक नवे मानक आहे. यात 10.25 इंच चे टचस्क्रीन आणि सर्व डिजिटल डायल मुख्य टॉकिंग पॉइंट आहेत. मोठ्या टच स्क्रीनचा उपयोग करणे सोपं आहे. यात तुम्हाला अपेक्षित सर्व सामान्य सुविधा उपलब्ध आहेत. या कारमध्ये व्यापक प्रमाणात डॅशबोर्डवर चालणाऱ्या लाईन मिळतील. कंपनीने भारतातील लोकांचा विचार करुन या कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे या कारमध्ये मोठी स्पेस पहायला मिळते. नवीन i20 एक मोठी कार आहे. त्याच्या मागील बाजूस तीन लोक आरामात बसू शकतात. कॉम्पॅक्ट SUV मध्येही काही कमी आहेत. याचे हेडरूम आणि लेगरूम सामान्य रुपात खूप चांगंली दिसतात.
फिचर्सच्या बाबतीत i20 खूप काही आहे आणि सोबतच लग्जरी कार मध्ये अनुभवायाला मिळणारे अनेक फिचर्स आहेत. क्लायमेट कंट्रोल, रियर एसी वेंट, स्टीयरिंग कंट्रोल, हाइट अॅडजस्ट ड्रायवर सीट, इलेक्ट्रिक मिरर, पुश बटन स्टार्ट, कूल्ड ग्लोवबॉक्स आणि इतरही बरचं काही. यात सनरूफ, 7 स्पीकर बोस ऑडियो, एयर प्युरीफायर आणि् वायरलेस चार्जिंग अशा सुविधा आहेत.आम्हाला यातील ऑडियो सिस्टम साउंड चांगले वाटले आणि सोबतच यात सिम बेस्ड कनेक्टेड टेक्नॉलॉजी मिळतील, जिथे आपण आपल्या फोनच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधांचा वापर करु शकतो. यात OTA मॅप अपडेटेड आहेत.
ड्रायविंगवर टेलीस्कोपिक स्टियरिंग देण्यात आली आहे जे कॉम्पॅक्ट एसयूवी किंवा त्याच्या स्पर्धकात मिळत नाही. आपल्याला समोरच्या रस्त्याचा नजारादेखील चांगल्या प्रकारे दिसू शकते. यातील इंजिन हार्ड नाही तसेच आवाजही करत नाही. डीसीटी ऑटोमॅटिक अधिक आरामदायक आहेत तसेच वापरायला सोपेही आहे. I20 मोठी असूनही हॅचबॅक आहे. याचा अर्थ आहे की ट्रॅफिक किंवा पार्किंगची कोणतीही समस्या नसेल. हॅचबॅक साठी 120 बीएचपी आणि 172 एनएम जे कि i20 टर्बोचा भाग आहेत. ही कार वास्तवात खूप वेगवान आहे. आपल्याला कळतही नाही की किती लवकर आपण वेग पकडला. ऑटोमॅटिक DCT चा अर्थ लॉन्ग डिस्टंस ड्रायविंग देखील जास्त आरामदायक आहे. i20 टर्बो मध्ये वेन्यू सारखे पॅडल शिफ्टर्स मिळत नाहीत.
जुन्या i20 किंवा याच्या स्पर्धकांच्या तुलनेत ही कार अधिक एनर्जेटिक आहे. याचे हॅडलिंग चांगले आहेत. याचा टर्बो अधिक स्थिर आहे. यात स्टॅंडर्ड 1.2l पेट्रोल ची सुविधा आहे जी पॉप्युलर ऑप्शन असू शकेल. शहरातील वापरासाठी ही कार चांगला पर्याय असू शकते. याचे मायलेज टर्बोच्या तुलनेत जास्त आहे.
याची किंमत 6.7 लाखांपासून सुरु होते. टर्बो i20 ची किंमत 8.7 लाख रुपये पासून सुरु होते. तर आपण पाहतोय ती लाल रंगाच्या कारची किंमत 11.17 लाख रुपये आहे. टॉप-एन्ड डीसीटी ऑटो एडिशन आहे. याची किंमत जरी जास्त वाटत असली तरी याच्यात जी टेक्नॉलॉजी मिळते ती हॅचबॅक मध्ये नाही मिळत. आपल्या स्पर्धक कारच्या तुलनेत नवी i20 मध्ये DCT सोबत टर्बोची सुविधा देण्यासोबतच अनेक वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या स्पेससोबत चांगला लूक आणि परफॉरमन्स याचा अर्थ आहे की ही कॉम्पॅक्ट एसयूवीपेक्षा सर्वात चांगली डील आहे.
काय आवडलं - परफॉर्मन्स, DCT गियरबॉक्स, गुणवत्ता, लूक, फिचर्स, मोठी जागा
काय आवडलं नाही - टर्बो DCT जरा जास्त महाग आहे, टर्बो म्यॅन्युएल नाही.
महत्वाच्या बातम्या: