एक्स्प्लोर
Advertisement
तुम्ही बोला, टाईप आपोआप होईल, पिंपरीच्या तरुणाचं अॅप
पिंपरी-चिंचवड : लॅपटॉपवर लांबलचक लेख लिहिण्याचा तुम्हालाही कंटाळा येतो का, मात्र आता तुम्ही एका क्लिकसरशी हवं तितकं टाईप करु शकणार आहात. तुमची बोलीच तुम्हाला हवं ते टाईप करुन देणार आहे.
लॅपटॉपला बोटही न लावता, जे बोलाल ते टाईप करण्याची किमया केली आहे चैतन्य चोरडियाने. पोलिस स्टेशन, शासकीय कार्यालय, शिक्षण संस्था अशा कार्यालयांतील कामकाज झटपट व्हावं यासाठी खाजगी आयटी कंपनीत काम करणाऱ्या चैतन्य ने LINGO SAVVY हे अॅप्लिकेशन बनवलं आहे.
ज्या स्पीडमध्ये आपण बोलतो अगदी त्याच वेगाने या अॅपद्वारे टायपिंग करता येते. यासाठी फक्त तुमची बोली स्पष्ट असायला हवी. सध्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीन भाषेत हे अॅप्लिकेशन टायपिंग करतं. लवकरच अन्य भाषाही यामध्ये दाखल होणार आहेत.
हे अॅप्लिकेशन तयार करण्यासाठी चैतन्यने आठ महिने कष्ट घेतले. हे अॅप फक्त लॅपटॉप आणि संगणकासाठीच बनवण्यात आलं आहे. एखादी परदेशी व्यक्ती आली आणि त्याच्याशी संभाषण करण्यात तुम्हाला अडचणी आल्या, तर हे अॅप्लिकेशन तुमच्या मदतीला नक्की असेल.
चैतन्यचं हे अॅप लवकरच तुमच्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमध्ये दिसणार आहे. चैतन्यसारखे तरुण असे नवनवे अॅप बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे स्वप्न साकारण्याला हातभार लावत आहेत. यासाठी सरकारने अशा तरुणांना फक्त प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement