(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#KooKiyaKya मोहीम लोकांना सांगते आहे व्यक्त व्हा! मातृभाषेत व्यक्त होण्यास प्रोत्साहन
मेड-इन-इंडिया मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म - कू Koo ची पहिली-वाहिली टेलिव्हिजन मोहीम लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्यास प्रेरणा देते आहे.
Koo’s Ad Campaign Inspires Self-Expression Through #KooKiyaKya : मेड-इन-इंडिया मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म - कू Koo ची पहिली-वाहिली टेलिव्हिजन मोहीम लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्यास प्रेरणा देते आहे. स्वभाषेत व्यक्त होण्याचा मूळ उद्देश #KooKiyaKya या टॅगलाइनचा हेतू आहे, की युजर्सनी स्वभाषेत व्यक्त व्हावे. नुकत्याच झालेल्या 2021 च्या T20 विश्वचषकादरम्यान सुरू करण्यात आलेल्या या मोहीमेअंतर्गत युजर्स अभिव्यक्तीसाठी सोशल मीडियाचा उपयोग करत आपल्या समूहाशी जोडून घेऊ शकतात. तेही त्यांच्या आवडत्या भाषेत!
कू अॅपसाठी नाझेरिअन स्थानिक भाषा एक नवीन संधी
आत्तापर्यंत सोशल मीडियावरील अभिव्यक्ती प्रामुख्याने इंग्रजी भाषेत एकवटलेली होती. Koo ॲपच्या जाहिराती मात्र लोकांना इंग्रजीवर अवलंबून न ठेवता मूळ भारतीय भाषेत संवाद साधायला आमंत्रित करत आहेत. Ogilvy India च्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोहिमेत छोट्या-स्वरूपातील जाहिरातींची मालिका बघायला मिळेल. या जाहिराती स्थानिक घडामोडी, सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील घटना, त्यांनी एकमेकांची केलेली थट्टा मस्करी किंवा विचारविनिमय यांचं वास्तव चित्रण करतात. ‘अब दिल में जो भी हो, कू पे कहो’, संदेशाभोवती या जाहिराती फिरतात. ही मोहीम इंटरनेट युजर्सची मनं डीकोड करते. सोबतच यातून युजर्सना मूळ भाषेत डिजिटली संवाद साधत माहिती शेअर करता येते. त्यासाठी ही मोहिम सखोल संशोधन आणि मार्केट मॅपिंगचा आधार घेते.
मार्च 2020 मध्ये लाँच केलेल्या, Koo ॲपने अलीकडेच दीड कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केलाय. ‘कू’ सध्या 9 भाषांमध्ये उपलब्ध आहे - हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगु, मराठी, बांगला, आसामी, गुजराती आणि इंग्रजी. पुढील एका वर्षात ‘कू’ ने 100 दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा पूर्ण करणे अपेक्षित आहे.
संबंधित बातम्या :