IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: abp majha web team | Updated at : 24 Nov 2021 07:26 AM (IST)
Edited By: निलेश झालटे
twitter_koo
नवी दिल्ली : कू एक असा मंच आहे जिथं लोक आपले विचार व्यक्त करु शकतात आणि इतरांचे विचार फॉलो करु शकतात. ट्विटर विदेशी अॅप आहे जिथं इंग्रजीला प्राथमिकता दिली जाते. 100 कोटींहून अधिक भारतीयांना इंग्रजी भाषेत व्यक्त व्हायला अडचणी आहेत. अशा लोकांसाठी एक सशक्त मंच आणण्याची गरज भासली, यातून कू अॅपची निर्मिती झाली असल्याचं कू चे फाऊंडर मयांक बिदावत्का यांनी सांगितलं. ABP Uncut मध्ये Koo चे कू चे फाऊंडर मयांक बिदावत्का (Co Founder Mayank Bidawatka) यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी Koo App हे ट्विटरच्या तुलनेत कसं चांगलं आहे, यावर चर्चा केली. कू ही मायक्रो ब्लॉगिंग साइट 2020 मध्ये सुरु झाली. दीड वर्षात 15 मिलियन लोक कू शी जोडले गेले आहेत. आमचा फोकस भारत देश आहे. येत्या पाच वर्षात आम्ही भारतासह जगभरातील अनेक लोकांशी जोडले गेलेले असू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ताज्या बातम्या आणि अचूक विश्लेषणांसाठी एबीपी माझाला Koo अॅपवरही फॉलो करा...!
ट्वीटर आणि कूमध्ये फरक काय...
सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्हीमधील दृष्टीकोनात फरक आहे. ट्विटर विदेशी आहे. जिथं सर्व लोक इंग्रजीत व्यक्त होतात. भारतात हजारो भाषा बोलल्या जातात. आपल्या देशात 100 कोटींहून अधिक लोकांना इंग्रजी भाषेत व्यक्त व्हायला अडचणी आहेत. या लोकांना व्यक्त व्हायचं आहे मात्र त्यांच्याकडे माध्यम नाही. अशा लोकांसाठी एक सशक्त मंच आणण्याची गरज भासली. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत कू या स्वदेशी अॅपची निर्मिती झाली. भारतीय भाषा, भारतीय लोकांना प्राथमिकता देण्यासाठी कू अॅपची निर्मिती करण्यात आली असल्याचं बिदावत्का यांनी सांगितलं.
Koo app: ट्विटरला पर्याय ठरु पाहणारे स्वदेशी अॅप Koo काय आहे?
बिदावत्का यांनी म्हटलं की, ट्विटरवर अनेक मान्यवर व्यक्तिंना ब्लॉक करण्यात आलं आहे. आम्ही मात्र खूप कमी प्रसंग असतील ज्यावेळी लोकांना बॅन करु. समोरच्या व्यक्तिनं काही चुकीचा कंटेट टाकला असेल तर त्यांना तो कंटेट कसा चुकीचा किंवा वादग्रस्त आहे हे सांगू. त्यांचं ते कंटेट का काढलं हे त्यांना सांगू. राष्ट्रीय सुरक्षेसारखा मुद्दा असेल तरच त्या व्यक्तीला बॅन करु, असं बिदावत्का यांनी सांगितलं
बिदावत्का म्हणाले की, कू अॅपला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. अनेक लोकं जुळले आहेत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. एवढा प्रतिसाद मिळतोय याची अपेक्षा नव्हती. सर्व स्तरांमधील लोकं बोलत आहेत. भारतीय यूजर्स आम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय.
ही अॅप्स भारतात Twitter ला पर्याय ठरू शकतात, यांची वैशिष्ट्ये जाणून घ्या
बिदावत्का यांनी म्हटलं की, राजकीय नेते मोठ्या प्रमाणावर कू करत आहेत. त्यांचे सर्व अपडेट्स टाकण्यासाठी ते कू चा वापर करत आहेत. राजकीय नेत्यांशी जुळण्याची ही सोपी पद्धत आहे. मनोरंजन, क्रिडा, साहित्य, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी कू अॅपशी जुळले गेले आहेत. मान्यवर व्यक्तिंना कू शी जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मान्यवर व्यक्ति कू वर आल्यानंतर सामान्य लोकंही त्यांचे विचार पाहायला तसेच व्यक्त व्हायला कू वर येत आहेत, असं बिदावत्का यांनी म्हटलं.
Ray-Ban Meta Glasses: AI ग्लासेस्, व्हिडीओ कॅप्चरची क्षमता, UPI सपोर्ट; Ray-Ban Meta चष्मा लॉन्च, किंमत किती?
मोठी बातमी, आता व्हाटसॲप, टेलीग्राम, स्नॅपचॅटचा वापर करण्यासाठी सिम कार्ड आवश्यक,अन्यथा ॲप बंद होणार केंद्रानं नवे नियम बनवले, अंमलबजावणी कधी?
ईस्पोर्ट्स: तरूण भारतीयांसाठी एक विश्वासार्ह आणि महत्त्वाकांक्षी करियरचा मार्ग
Most Common Passwords in India : तुम्ही मोबाईल अन् सोशल मीडियासाठी जो पासवर्ड वापरताय, तोच आणखी किती भारतीय वापरतायत?
Google Chrome वापरताय, तर सावधान! सरकारने केला महत्वाचा अलर्ट जारी, वाचा सविस्तर
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?