कू अॅपसाठी नाझेरिअन स्थानिक भाषा एक नवीन संधी
भारतात कू ॲप हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू, मराठी, बांगला, आसामी, गुजराती आणि इंग्रजीसह भविष्यात लान्च होणार्या अनेक भाषांमध्ये अखंड संवाद साधण्याची सुविधा देते.
नवी दिल्ली : नायजेरियात (Nigeria) पाचशेहून अधिक भाषा आहेत. साहजिकच नायजेरिया हा देश बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी एक मोठाच अवकाश मिळवून देतो. स्वत:चे विचार मातृभाषेमध्ये व्यक्त करण्यास प्रत्येकाला सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून कू (Koo App) आफ्रिकेतील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत - नायजेरियामध्ये आपली मुद्दा उमटवत आहे. हे मेड-इन-इंडिया ॲप लोकांना इंग्रजी भाषेपलिकडे जात त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचे सामर्थ्य देते.
भारतात कू ॲप हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू, मराठी, बांगला, आसामी, गुजराती आणि इंग्रजीसह भविष्यात लान्च होणार्या अनेक भाषांमध्ये अखंड संवाद साधण्याची सुविधा देते. भारताप्रमाणेच नायजेरियातही भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आहे. इग्बो, हौसा, योरूबा, फुला, तिव इत्यादी पाचशेहून अधिक भाषा इथे अस्तित्वात आहेत. आफ्रिकेतील सर्वात जास्त जीडीपी असलेल्या नायजेरियाचे बहुभाषिकत्व त्याला वेगळी ओळख देते. ‘कू’ने याच बहुभाषिकत्वाला आधार बनवत सोशल मीडियाच्या दुनियेत आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे.
नायजेरियाची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. सध्या हे ॲप नायजेरियात उपलब्ध आहे. कू ॲप आफ्रिकन राष्ट्रातील यूजर्सना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी सक्षम बनवेल. सोबतच ते युजर्सना एकमेकांशी घट्ट जोडेल. हा प्लॅटफॉर्म नायजेरियामध्ये प्रभावीपणे विकसित होतो आहे. भारताप्रमाणेच नायजेरियन यूजर्सना भाषेचा सखोल अनुभव देण्यासाठी देशातले सांस्कृतिक बारकावेही समोर आणत आहे.
'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक सूक्ष्म-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, 'कू' विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त 10% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे. जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी 'कू' एक मंच मिळवून देतो.
संबंधित बातम्या :