iphone 14 : लवकरच येत आहे iphone 14 Plus? Apple पुढील आठवड्यात प्लस मॉडेल लॉन्च करण्याची अपेक्षा
iphone 14 Plus Launch In India : अॅपल (Apple) कंपनी लवकरच आपल्या नवीन आयफोनची (iphone) घोषणा करणार आहे.
iphone 14 Plus Launch In India : अॅपल (Apple) कंपनी लवकरच आपल्या नवीन आयफोनची (iphone) घोषणा करणार आहे. 7 सप्टेंबर रोजी आयोजित एका व्हर्च्युअल लॉन्च इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरिज लॉन्च करण्यात येणार आहे. या वर्षी, कंपनी चार नवीन आयफोन मॉडेल्सचे अनावरण करेल अशी अपेक्षा आहे. असे सांगण्यात येते की, Apple या वर्षी मिनी मॉडेल सोडून त्याऐवजी iPhone 14 Max लाँच करेल. नवीन अहवालानुसार, मॅक्स ऐवजी iPhone 14 Plus असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवीन अहवालानुसार, 6.7-इंच नॉन-प्रो मॉडेलला iPhone 14 Plus असे नाव देण्यात आले आहे. तसेच, Apple पुढील आठवड्यात चार मॉडेल लॉन्च करणार आहे. ते पुढीलप्रमाणे - iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, आणि iPhone 14 Pro Max.
2014 मध्ये आयफोन 6 सीरिजमध्ये पहिले आयफोन प्लस मॉडेल रिव्हील करण्यात आले होते. iphone 6 हा आतापर्यंतचा सर्वाधिक विकला जाणारा आयफोन होता. तीन वर्षांनंतर, 2017 मध्ये, Apple ने iPhone 8 Plus डब केलेले दुसरे प्लस मॉडेल रिव्हील केले. पण यावर्षी म्हणजेच तब्बल 5 वर्षांनंतर मात्र, iphone plus मॉडेल आणण्याची शक्यता आहे.
लीक झालेल्या इमेजमध्ये असे दिसून आले आहे की, आयफोन 14 प्लस हे आयफोन 14 मॅक्स नावाऐवजी ब्रँडिंगसह सूचीबद्ध आणि पॅकेज केलेले आहे. अॅपलचा आगामी 6.7-इंचाचा आयफोन मॉडेल आयफोन 14 प्लस म्हणून ओळखला जाईल असा अंदाज सूत्राने वर्तवला आहे. आयफोन मॉडेल एक मोठा 6.7-इंचाचा डिस्प्ले, A16 बायोनिक चिपसेट, ड्युअल रीअर कॅमेरे, iPhone 13 प्रमाणे रुंद-नॉच, मोठे बॅटरी युनिट, iOS 16 सपोर्ट आणि बरेच काही ऑफर करेल.
किंमत किती?
iPhone 14 ची किंमत iPhone 13 च्या लॉन्च किंमतीपेक्षा किंचित कमी असेल. iPhone 14 (128GB) च्या बेस व्हेरिएंटची किंमत $750 (अंदाजे रु 59,600) असेल. नियमित iPhone 13 (128GB) मॉडेल $799 (अंदाजे रु. 63,600) च्या किमतीत लॉन्च करण्यात आले होते. त्याच अहवालात असेही समोर आले आहे की, iPhone 14 Max/Plus ची किंमत iPhone 14 पेक्षा किमान $100 अधिक असेल.
महत्वाच्या बातम्या :