(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter Edit Button : ट्विटर यूजर्ससाठी आनंदाची बातमी, आता ट्वीट एडिट करायचा पर्याय उपलब्ध
Twitter Edit Feature : ट्वीट एडिट करण्याची मागणी अनेक दिवसापासून होती. टेस्लाचे CEO यांनी देखील ट्वीट करत ही मागणी केली होती. अखेर ट्विटरने हा पर्याय युजर्सला देण्याचा निर्णय घेतला आहे.
Twitter Edit Button : अनेकदा आपण ट्वrट केल्यानंतर काही वेळानंतर चूक झाल्याचे लक्षात येते परंतु एडिटचा पर्याय नसल्याने ते ट्विट डिलिट करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. आता याच अडचणीची दखल ट्विटरने घतली असून लवकरच आपल्याला ट्वrट एडिट करण्याचा पर्याय मिळणार आहे. ट्विटर युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.
दरम्यान सुरुवातीला ही सुविधा ट्विटर व्हेरीफाईड अकाउंट असणाऱ्यांना मिळणार आहे. ट्वीट एडिट करण्याची मागणी अनेक दिवसापासून होती. टेस्लाचे CEO यांनी देखील ट्वीट करत ही मागणी केली होती. अखेर ट्विटरने हा पर्याय युजर्सला देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्ल्यू टिक असलेल्या सदस्यांसाठी दरमहा 4.99 डाॅलरमध्ये हे फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे.
if you see an edited Tweet it's because we're testing the edit button
— Twitter (@Twitter) September 1, 2022
this is happening and you'll be okay
ट्वीट केल्यानंतर फक्त 30 मिनिटांपर्यंत एडिट करता येणार
ट्वीट केल्यानंतर यूजर्सला अर्ध्या तासापर्यंत ट्वीट एडिट करता येणार आहे. सध्या ट्विटरने याची टेस्टिंग सुरू केली आहे. ट्विटरने ट्वीट करत सांगितले आहे की, जर तुम्ही ट्वीट केल्यानंतर तुम्हाला एडिटचा पर्याय दिसत असेल तर हे टेस्टिंगमुळे हा पर्याय दिसच आहे. सुरूवातीला ही सुविधा फक्त व्हेरिफाईट अकाउंट असणाऱ्या युजर्सला मिळणार आहे.
या नव्या पर्यायामुळे तुम्हाला ट्वीट बदलता येणार आहे पण यामध्ये एक छोटा ट्विस्ट आहे. तुम्हाला ट्वीट एडिट करायचा पर्याय मिळेल पण तुम्हाला तुमच्या ट्वीटची संपूर्ण हिस्ट्री पाहयला मिळेल. म्हणजे तुम्ही केलेल्या पहिल्या ट्विटपासून ते तुम्ही बदलेल्या ट्विटपर्यंत. भारतात ही सुविधा कधीपासून येणार याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण व्हेरिफाईट ट्विटर अकाउंट असणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे ट्वीट कोणी पाहिले हे देखील तुम्हाला समजणार आहे.
किती युजर्सला होणार लाभ?
ट्विटरवर 320 मिलियनपेक्षा अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामप्रमाणे ट्विटरवर देखील एडिटचा पर्याय उपलब्ध करावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. सध्या याचे टेस्टिंग सुरू आहे.
संबंधित बातम्या :