iPhone 14 Series Launch Date : प्रतीक्षा संपली! Apple Eventची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार iPhone 14 Series लॉन्च
iPhone 14 Series Launch Date : दरवर्षीप्रमाणे यंदाही अॅपलचा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील अॅपल पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
iPhone 14 Series Launch Date : अॅपल (Apple) युजर्सची प्रतीक्षा संपली असून लवकरच आगामी आयफोन युजर्सच्या भेटीला येणार आहे. अॅपल कंपनीनं याची अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की, Apple चा आगामी iPhone (iPhone 14 Launch Date) 7 सप्टेंबर रोजी लॉन्च केला जाणार आहे. कंपनीनं त्याच्या लॉन्चिंग इव्हेंटसाठी आमंत्रणंही पाठवण्यास सुरुवात केली आहे. आयफोन 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Mini या वर्षीच्या Apple इव्हेंटमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. तसेच, कंपनी नवीन Apple Watch ची घोषणा देखील करू शकते.
Apple iPhone 14 Series Launch Event
दरवर्षीप्रमाणे यंदाही अॅपल इव्हेंट कॅलिफोर्नियाच्या क्युपरटिनो शहरातील Apple Park मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कंपनीनं लोकांना निमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीद्वारे शेअर करण्यात आलेल्या निमंत्रणामध्ये याची वेळ 10 am PT ठेवण्यात आला आहे.
iPhone 14 Series
Go for launch. Tune in for a special #AppleEvent on September 7 at 10 a.m. PT.
— Apple (@Apple) August 24, 2022
Tap the ❤️ and we’ll send you a reminder on event day. pic.twitter.com/T9o7qJt72E
Apple इव्हेंटचे मुख्य आकर्षण म्हणजे iPhone 14 सिरीज. याआधी लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, या सीरिजमध्ये iPhone 14 Mini लॉन्च होणार नाही. दरम्यान, नुकत्याच आलेल्या एका अहवालात असं म्हटले आहे की, कंपनी यावर्षी देखील iPhone 14 Mini लाँच करेल. iPhone 14 Mini मध्ये 5.4-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, तर iPhone 14 आणि iPhone 14 Pro सारख्या डिव्हाइजमध्ये डिस्प्ले साईज 6.1 इंच असू शकते. तसेच, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याशिवाय iPhone 14 सीरीजच्या कॅमेरा आणि स्टोरेजमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. तसेच, नवीन आयफोनची किंमत आधीच्या मॉडेलच्या तुलनेत 10,000 रुपयांपर्यंत जास्त असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
ए16 बायोनिक चिप असणाऱ्या नव्या आयफोनमध्ये पिल-शेप्ड आणि होल-पंच कटआउट बाजूने नॉच काढून टाकू शकतात. विशेष म्हणजे, 5.4-इंचाचा iPhone Mini नसेल कारण लहान iPhone 12 आणि 13 Mini डिव्हाइसेसला युजर्सची फारशी पसंती न मिळाल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे.
iPhone 14 Pro लूक
लीक रिपोर्टनुसार, आयफोन 14 प्रो जांभळ्या रंगात असेल. तसेच या आयफोनमध्ये गोल्ड आणि ग्रे रंगाचा पर्यात उपलब्ध असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या आयफोन 14 प्रोमध्ये डिस्प्लेवर नॉनऐवजी पंच-होल आणि गोल कटआऊट डिझाइन असेल. शिवाय डिस्प्लेमध्ये अरुंद बेझल्स असतील, यामुळे या आयफोनला अधिक पॉलिश लूक मिळेल, असा अंदाज लीक रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे.