Instagram New Feature : आता इंस्टाग्राम स्वत:च तुम्हाला सांगेल - 'ब्रेक नंतर भेटू', Take a Break फीचर भारतात लाँच
Instagram 'Take a Break' : इंस्टाग्रामने 'Take a Break'फीचर लाँच केलं आहे. आता इंस्टाग्राम स्वतः या प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ घालवणाऱ्यांना सांगेल, ब्रेक नंतर भेटू.
Instagram New Update : जर तुम्ही इंस्टाग्रामवर (Instagram) बराच वेळ घालवत असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी आहे. इंस्टाग्रामने भारतात 'Take a Break' फीचर लाँच केलं आहे. या फीचरच्या नावाप्रमाणेच, इंस्टाग्राम आता या प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवणाऱ्यांना स्वतःहून ब्रेक घेण्यास सांगणार आहे. हे फीचर नेमकं काय आहे आणि ते कसं काम करेल हे जाणून घेऊयात.
असं आहे फीचर :
हे फीचर लॉंच झाल्यानंतर आता Instagram यूजर्स ठराविक वेळ घालवल्यानंतर काही काळ या प्लॅटफॉर्मवरून ब्रेक घेऊ शकतात. नवीन फीचरमध्ये तीन टाईम स्लॉट समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये 10 मिनिटे, 20 मिनिटे आणि 30 मिनिटांचा समावेश आहे. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन यापैकी कोणताही टाइम स्लॉट निवडल्यास, इतका वेळ इंस्टाग्राम वापरल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर ब्रेक घेण्यास सांगणारी सूचना येईल. यानंतर तुम्ही 'yes' बटणावर क्लिक करून ब्रेक घेऊ शकता. हे फीचर तुमच्या अॅपवर बाय डीफॉल्ट येणार नाही. तुम्हाला ते स्वतः सेट करावे लागेल. जर यूजर्सना या फीचरचा लाभ घ्यायचा नसेल तर, 'off' बटणावर क्लिक करावे लागेल.
म्हणून गरज
आजकाल तरुण वर्ग या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवत आहे. यावरून कंपनीवर सातत्याने टीका होत आहे. अमेरिकेतही कंपनीला याबाबत सातत्याने विरोध होत आहे. इंस्टाग्राममुळे अनेक तरुण अनेक प्रकारे बेकार झाले आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. हे सर्व पाहता हे नवीन फीचर कंपनीसाठी खूप प्रभावी ठरणार आहे. इंस्टाग्रामच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नताशा जोग यांनी फीचर लॉंच करताना सांगितले की, "तरुणांचे कल्याण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि या फीचरमुळे आम्ही त्यांना अधिक व्यसनांपासून वाचवू शकू. तरुण यूजर्स आणि पालकांना या प्लॅटफॉर्मवर अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही 'Take a Break' लाँच केले आहे. इंस्टाग्रामवर सुरक्षित वातावरण तयार करण्याचे आमचे ध्येय आहे."
महत्वाच्या बातम्या :
- Instagram New Feature : इंस्टाग्राम रीलवर आता 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवता येणार, नवीन फीचर लवकरच लाँच होणार
- Instagram New Feature : इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आता 3D अवतार, लवकरच येणार नवं फीचर
- EV Charging Station : सहज उभारता येईल इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, 'या' पोर्टलवर मिळणार परवाना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha