Smartphone : अनेक प्रयत्न करूनही जुना स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? 'या' टिप्स फॉलो करा
Smartphone Fast Charging : तुमचा स्मार्टफोन कमी वेळेत कसा चार्ज करायचा यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Fast Charging Tips : सध्याच्या काळात स्मार्टफोन आणि आयफोन यांना बाजारात खूप मागणी आहे. बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार आपलाही फोन स्मार्ट असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि त्यानुसार महागडे स्मार्टफोन घेण्याची मागणी वाढते. परंतु, ठराविक काळानंतर एकदा स्मार्टफोन जुना झाल्यास त्याचा स्पीड कमी होऊ लागतो. तसेच, चार्जिंगही लवकर होत नाही. अशा वेळी तुमचा स्मार्टफोन कमी वेळेत कसा चार्ज करायचा यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फास्ट चार्जर खरेदी करा :
तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग जलद गतीने व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात आधी फास्ट चार्जर खरेदी करा. त्याआधी तुमचा स्मार्टफोन त्या चार्जरला सपोर्ट करतो का हे तपासून घ्या.
इतर न वापरण्यात येणारे फीचर्स बंद करा :
स्मार्टफोनमध्ये एकाच वेळी अनेक फीचर्स सुरु असतात. अशा वेळी स्मार्टफोनची बॅटरी लगेच डाऊन होते. त्यामुळे जे फीचर्स सतत वापरण्यात येत नाहीत ते त्वरित बंद करा. जसे की, ब्लू टूथ, लोकेशन, ब्लूटूथ वाय-फाय आणि इतर. हे फीचर्स बंद केल्याने डिव्हाईसच्या चार्जिंग स्पीडमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
यूएसबी पोर्टद्वारे न करता वॉल सॉकेटद्वारे चार्ज करा :
अनेकदा कामाच्या धावपळीत स्मार्टफोन घरी चार्ज करायला विसरतो. आणि कारमध्ये किंवा लॅपटॉपद्वारे यूएसबी पोर्टलच्या साहाय्याने स्मार्टफोन चार्ज केला जातो. यामुळे थेट तुमच्या स्मार्टफोनवर परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो तुमचा स्मार्टफोन वॉल सॉकेटद्वारेच चार्ज करण्याचा प्रयत्न करा.
ओरिजनल केबल वापरा :
दुसऱ्या ब्रँडचा चार्जर वापरल्याने तुमच्या डिव्हाइसची बॅटरी खराब होऊ शकते आणि चार्जिंगच्या स्पीडवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ओरिजनल केबल वापरा.
या काही सोप्या पद्धती वापरून जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज केला तर नक्कीच कमी वेळात तुमचा स्मार्टफोन जलद गतीने सक्रिय अॅक्टीव्ह होईल.
महत्वाच्या बातम्या :