जगाच्या लोकसंख्येहून अधिक वेळा Google चं 'हे' अॅप डाऊनलोड झालंय
युट्यूब व्यतिरिक्त फेसबुक आणि त्याची उत्पादने जगातील सर्वात जास्त डाउनलोडमध्ये समाविष्ट आहेत. डाउनलोड करण्याच्या बाबतीत, यूट्यूब एक हजार कोटींच्या डाऊनलोडसह पहिल्या क्रमांकावर आहे.
Tech News : इंटरनेट ही सध्याच्या जगात गरज बनली आहे. फेसबूक, युट्युब, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर अनेकांचा बहुतेव वेळ जातो. या सोबतच गुगल आणि त्याची इतर प्रोडक्ट्स जगभरात लोकप्रिय आहेत. त्यातच आता गूगलच्या यूट्यूबने डाऊनलोड करण्याचे सर्व रेकॉर्ड मोडले. Google च्या मालकीचे YouTube जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक डाउनलोड केले गेले आहे.
एका अहवालानुसार, गुगल प्ले स्टोअर वरून यूट्यूब एक हजार कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. ही आकडेवारी जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. सध्या जगाची लोकसंख्या ही 788 कोटी आहे. म्हणजेच यूट्यूबचे डाऊनलोड जगातील लोकसंख्येपेक्षा 217 कोटी जास्त आहेत. यात Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी डाउनलोडचा समावेश आहे.
सर्वाधिक डाउनलोड झालेले अॅप
युट्यूब व्यतिरिक्त फेसबुक आणि त्याची उत्पादने जगातील सर्वात जास्त डाउनलोडमध्ये समाविष्ट आहेत. डाउनलोड करण्याच्या बाबतीत, यूट्यूब एक हजार कोटींच्या डाऊनलोडसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसर्या क्रमांकावर फेसबुकने कब्जा केला आहे. फेसबुक आतापर्यंत 700 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. त्याचबरोबर फेसबुकचंच दुसरं प्रॉडक्ट व्हॉट्सअॅप तिसर्या क्रमांकावर आहे. व्हॉट्सअॅप आतापर्यंत 600 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. चौथ्या क्रमांकावर फेसबुक मेसेंजर आहे. हे आतापर्यंत 500 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. त्याचबरोबर फेसबुकच्या इन्स्टाग्रामचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामला आतापर्यंत 300 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे.
लॉकडाऊनमध्ये युट्यूबची लोकप्रियता आणखी वाढली
कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यूट्यूब डाउनलोडमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. लोक त्यांच्या घरी YouTube वरून व्हिडीओ पाहून खाद्य पदार्थ बनवताना दिसले. याशिवाय स्मार्टफोनमध्ये मुले देखील यूट्यूबवर जास्त वेळ घालवतात.