Google Pixel 6 Launch : Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro लॉन्च; काय आहेत फिचर्स?
Google Pixel 6 Launch : बहुप्रतिक्षित Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro ग्लोबली लॉन्च करण्यात आला. अनेक अद्ययावत फिचर्सची पर्वणी युजर्सना या फोन्समध्ये मिळणार आहे.
![Google Pixel 6 Launch : Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro लॉन्च; काय आहेत फिचर्स? Google Pixel 6 Launch google pixel 6 pixel 6 pro launch today how to watch google event livestream on youtube Google Pixel 6 Launch : Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro लॉन्च; काय आहेत फिचर्स?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/46ff894870a66e1c06ad63847f6dcd12_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Google Pixel 6 Launch : गूगलने आज Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro लॉन्च केले आहेत. लॉन्चिंग इव्हेंट भारतीय वेळेनुसार, रात्री साडेदहा वाजता सुरु झाला होता. गेल्या बऱ्याच काळापासून या दोन्ही स्मार्टफोन्सची युजर्स आतुरतेनं वाट पाहत होते. दरम्यान, दोन्ही स्मार्टफोन्सचे काही फिचर्स यापूर्वीही लीक झाले होते. जाणून घेऊया दोन्ही स्मार्टफोन्सच्या फिचर्सबाबत...
Pixel 6 Pro
Pixel 6 Pro मध्ये फोनच्या मागच्या बाजूस ट्रिपल कॅमेरा, Tensor चिपसेटसह 6.7 इंचाचा डायनॅमिक डिस्प्ले (10 ते 120 Hz) आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन 12GB रॅमसह लॉन्च झाला आहे.
Google Pixel 6 ची किंमत
Pixel 6 Pro ची किंमत 899 डॉलर आणि Pixel 6 ची किंमत 599 डॉलर्सपासून सुरु होणार आहे.
Pixel 6, Pixel 6 Pro चा कॅमेरा
- Pixel 6 आणि Pixel 6 Pro दोन्हींमध्ये मागील बाजूस 50MP चा नवा कॅमेरा देण्यात आला आहे.
- Google चं म्हणणं आहे की, प्रायमरी सेंसर आता 150 टक्क्यांनी अधिक लाइट (Pixel 5 च्या प्रायमरी कॅमेऱ्याच्या तुलनेत) कॅप्चर केलं जातं. फोनमध्ये मोठा सेंसर असणारी नवी अल्ट्रावाइड लेंस देण्यात आली आहे.
- Pixel 6 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 48MP चा टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे.
- Pixel 6 Pro मध्ये Pixel च्या Super Res Zoom च्या सर्वोत्तम वर्जनसह 4X ऑप्टिकल झूम आणि 20x झूमपर्यंत आहे. एक अपग्रेडेड अल्ट्रावाइड फ्रंट कॅमेराही आहे. जो 4K व्हिडीओ रेकॉर्ड करतो. इन्स्टंट स्नॅपचॅट एक्सेससाठी एक नवं क्विक टॅप टू स्नॅप फिचर या वर्षाअखेरपर्यंत विशेष रुपात पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रोसाठी येणार आहे.
- अशातच Pixel 6 मध्ये आताही एक ड्युअल कॅमेरा आहे : 50MP+12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा
- Google एक नवा मॅजिक इरेझर फिचरही घेऊन येत आहे. जो फोटोंमध्ये डिस्ट्रेक्शनला गायब करु शकतो. हे Google फोटोवर येणार आहे.
Pixel 6 आणि Tensor आणि फास्ट टायपिंग
Google ने माहिती दिली की, Pixel 6 आणि त्याचा Tensor चिपसेट नव्या स्पीच रिकग्निशन मॉडलवर चालतो. जो हे ठरवू शकतो की, फोन तेच समजून घेतो, जे तुम्ही त्याला सांगता. पिक्सलमध्ये सर्वात जलद आवाज टायपिंगची क्षमता आहे. आणि मॉडल यूजरच्या सवयीनुसार अनुकूल होऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)