Apple Launch Event 2021 : नवा MacBook Pro आणि AirPods 3 शानदार फिचर्ससह लॉन्च; भारतात असेल 'ही' किंमत
Apple Launch Event 2021 : अॅपलचा बहुप्रतिक्षित इव्हेंट काल पार पडला. या इव्हेंटमध्ये MacBook Pro आणि AirPods 3 शानदार फिचर्ससह लॉन्च करण्यात आला.
Apple Launch Event 2021 : अॅपलनं आपल्या ऑक्टोबर इव्हेंटमध्ये आपल्या लेटेस्ट प्रोडक्ट्सवरुन पर्दा हटवला आहे. अॅपलनं या इव्हेंटमध्ये M1 Pro आणि M1 Max चिप लॉन्च केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मॅकबुक प्रो लॅपटॉपला नव्या जनरेशनसह लॉन्च केलं आहे. तर, मॅकबुक प्रोला नॉचसोबत लॉन्च करण्यात आलं आहे. हा 14 इंच आणि 16 इंच अशा दोन व्हेरियंट्समध्ये लॉन्च करण्यात आला होता.
जाणून घेऊया नव्या मॅकबुकचे खास फिचर्स :
1. मॅकबुकचा कीबोर्ड फिजिकल डिलिवर करतो.
2. मॅकबुकचा टच रिप्लेस करण्यात आला.
3.HDMI पोर्ट, Thunderbolt 4, SD Card आणि एक हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
4- नवा MacBook Pro XDR 16.2-इंचाच्या डिस्प्ले साइजमध्ये उपलब्ध आहे.
5. उत्तम कलर्स, ब्राइटनेस आणि कान्ट्रास्टसाठी Liquid Retina XDR डिस्प्लेमध्ये मायक्रो- LED टेक्नोलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे.
6. 1,600 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला
7. MacBook Pro M1 Pro 16-इंच 2.5 पटीनं फास्ट आहे
8. M1 Pro आणि M1X Max 4 पटीनं फास्ट आहे.
9. 14-इंच MacBook Pro CPU परफॉर्मेंसमध्ये 3.7 पटींनी फास्ट आहे.
Get the news from the #AppleEvent here. Meet the new MacBook Pro and AirPods.⁰
— Apple (@Apple) October 18, 2021
Swipe to explore
बॅटरी
MacBook Pro आणि M1 Pro बाबत अॅपलनं दावा केला आहे की, याची बॅटरी उत्तम आहे. 14-इंच MacBook Pro 17 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकतो. तसेच, 16-इंच 21 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मॅकबुकला अर्ध्या तासांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केलं जाऊ शकतं.
किंमत
14-इंच MacBook Pro च्या किमतीबाबत बोलायचं झालं तर ही किंमत 1,999 डॉलरपासून सुरु होते. तर, 16 इंच मॉडल ची किंमत 2,4999 डॉलरपासून सुरु होते.
कंपनीने M1 Pro चं ब्रेकथो सांगितलं आहे. याचा अर्थ आहे की, हा Mac पेक्षा जास्त पॉवर देतो. यामध्ये 200GB/Sec मेमरी बँडविथ मिळते. त्यासोबतच 32 GB युनिफाइड मेमरीही देण्यात आली आहे.
तसेच, MA Max चिपही इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये 400GB/Sec मेमरी बँडविथ देण्यात आली आहे. त्यासोबतच 64 GBयूनिफाइड मेमरी देण्यात आली आहे.
AirPods
अॅपलने या इव्हेंटमध्ये AirPods लॉन्च केले आहेत. कंपनीनं सांगितलं की, हे वायरलेस इयरबड्स कंपनीचे थर्ड-जेन ऑडियो डिवाइस आहेत. कंपनीनं दावा केला आहे की, यामध्ये पहिल्यापेक्षा उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीनं याव्यतिरिक्त HomePod mini साठी नवा कलर आणि एक नवं Apple Music Voice Subscription प्लानचीही घोषणा केली आहे.
AirPods 3 ची वैशिष्ट्य :
फिचर्स
कंपनीनं AirPods 3 च्या डिझाइनमध्ये खास बदल केले आहेत. घाम आणि पाण्यापासून बचाव करणाऱ्या IPX4 रेटिंगसह Adaptve EQ आणि Spatial Audio यांसारखे फिचर्सही आहेत. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, नवे AirPods उत्तम बॅटरी लािफसह येतात. जे 6 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतात. त्यासोबतच हे इयरबड्स फास्ट चार्जिंग केससह येतात, जे MagSafe ला सपोर्टही करतात.
किंमत
कंपनीने Apple AiPods 3 ची किंमत $179 असल्याची घोषणा केली आहे. कंपनीनं सांगितलं की, आजपासून याची प्री-ऑर्डर सुरु होणार आहे आणि पुढच्या आठवड्यापासून विक्रीही सुरु होणार आहे.
याव्यतिरिक्त कंपनीने भारतासाठी किमतींची घोषणा केली आहे. भारतामध्ये याची किंमत 18,500 रुपये असणार आहे. भारतात AirPods 3 ची विक्री 26 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ही विक्री अॅपलच्या ऑनलाइन इंडिया स्टोरवरुन करण्यात येणार आहे.
HomePod mini
अॅपलने HomePod mini वेगवेगळ्या कलर्समध्ये सादर केले. डिव्हाइस आता Yellow, Orange आणि Blue कलर्समध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनीनं सांगितलं की, नव्या कलरचे मॉडेल नोव्हेंबरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील. या डिव्हाइसची किंमत 9,990 रुपये असणार आहे.