(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Scam Alert : गूगलकडून 150 अॅप्स बॅन; पण का? जाणून घ्या
Google Alert: कोणतीही गेम किंवा अॅप डाउनलोड करण्यासाठी अनेक लोक प्ले-स्टोअरचा वापर करतात. नुकतेच गूगलने 150 अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत.
Google Alert: कोणतीही गेम किंवा अॅप डाउनलोड करण्यासाठी अनेक लोक प्ले- स्टोअरचा वापर करतात. नुकतेच गूगलने 150 अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकले आहेत. प्ले स्टोअरमधील हे 150 एसएमएस अॅप्स UltimaSMS नावाच्या स्कॅमचा भाग होते. या स्कॅममध्ये लोकांना महिती न देता त्यांना प्रीमियम एसएमएस सर्विसच्या जाळ्यामध्ये अडकवून त्याच्याकडून पैसे घेतले जात होते. या एसएमएस स्कॅम अॅपला 10.5 मिलियनपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.
काय आहे UltimaSMS स्कॅम?
काही स्कॅमर लोकांनी ‘अल्टिमा एसएमएस’ (UltimaSMS) नावाने प्रिमियम एसएमएस स्कॅममध्ये लोकांना फसवले. मे 2021 मध्ये या स्कॅमची सुरूवात झाली. स्कॅमरनी कीबोर्ड, क्यूआर कोड स्कॅनर, व्हिडीयो, इमेज एडिटर, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमरा फिल्टर हे सर्व लोकांकडून डाऊनलोड करून घेऊन त्यांना फसवले. पाकिस्तान, सऊदी अरब, मिस्त्र, अमेरिका या आणि मध्य पूर्वच्या अनेक देशांमधील लोकांनी हे अॅप डाऊलोड केले होते.
अशा प्रकारे फसवले लोकांना
या बनावट अॅप्सच्या फिचर्सचा वापर करण्यासाठी यूजरला स्वत:चा मोबाईलनंबर आणि ई-मेल यांची माहिती देणे आवश्यक होते. त्यानंतर यूजरच्या लोकेशन आणि मोबाईल कॅरिअरचा वापर करून त्यांना पैसे देण्यास भाग पाडण्यात आले. 3 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे हे स्कॅमर घेत होते.
Fake Job Ads : सावधान ! नोकरीचे आमिष दाखवून चोरला जातोय तुमचा पर्सनल डेटा
बनावट एसएमएस अॅप्स पासून असे राहा सावध
आपल्या कॅरिअरमधून प्रीमियम एसएमएस ऑप्शनला डिसेबल करा.
मोबाईलमध्ये अॅप्स डाऊनलोड करताना त्याचे रिव्हूव नक्की वाचा.
अॅपला फोनमध्ये इन्टॉल करताना आलेले नेटिफिकेशन लक्ष देऊन वाचा.
हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाऊंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी! रिपोर्टमधून माहिती
जगाच्या लोकसंख्येहून अधिक वेळा Google चं 'हे' अॅप डाऊनलोड करण्यात आले आहेत.
युट्यूब व्यतिरिक्त फेसबुक आणि त्याची उत्पादने जगातील सर्वात जास्त डाउनलोडमध्ये समाविष्ट आहेत. डाउनलोड करण्याच्या बाबतीत, यूट्यूब एक हजार कोटींच्या डाऊनलोडसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसर्या क्रमांकावर फेसबुकने कब्जा केला आहे. फेसबुक आतापर्यंत 700 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. त्याचबरोबर फेसबुकचंच दुसरं प्रॉडक्ट व्हॉट्सअॅप तिसर्या क्रमांकावर आहे. व्हॉट्सअॅप आतापर्यंत 600 कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे.