एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादमधील UPI घोटाळ्याप्रकरणी 84 जणांविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबाद : औरंगाबादमधील यूपीआय घोटाळ्याप्रकरणी 84 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस अॅपच्या माध्यमातून औरंगाबादच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला साडेसहा कोटींचा चुना लावला गेला आहे.
या अॅपच्या माध्यमातून औरंगाबादच्या 1 हजार 214 बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपये लांबवण्यात आले आहेत. याप्रकरणी राजेश विश्वास या प्रमुख आरोपीला याआधी अटक झाली आहे.
महत्वाचं म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून नेमका किती रुपयांचा घोटाळा झाला याचा निश्चित आकडा अद्याप पुढे आलेला नाही.
यूपीआय घोटाळा काय आहे?
कॅशलेस भारताचे स्वप्न रंगवणाऱ्यांना एका ऑनलाईन घोटाळ्याचं चांगलाच झटका दिला आहे. नोटबंदीनंतरच्या काळात वापरलेल्या यूपीआय अॅपच्या माध्यमातून बँकाना काही लोकांनी कोट्यवधीचा गंडा घातला.
पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या युनायटेड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआय अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं. बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञनामधील त्रुटींचा फायदा घेत काही लोकांनी ही फसवणूक केली.
औरंगाबादेत 1 हजार 214 बँक खात्यातून कोट्यवधी रुपये लांबवले असल्याचं समोर आलं. यात औरंगाबाद शहरातील 800 खाती आहेत तर उर्वरीत ग्रामीण भागातील आहेत. विशेषत: बहुतांशी शून्य बॅलन्स असलेल्या जनधन खात्यातन हा प्रकार झाल्याचं समोर आला आहे.
कसा झाला घोटाळा?
बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमच्या (एनपीसीआय) माध्यमातून यूपीआय म्हणजे युनायटेड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यासाठी एक अॅप तयार करण्यात आलं.
या अॅपचे व्यवस्थापण मेसर्स इन्फ्रासॉफ्ट टेक्नोलॉजी यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले. हे अॅप मोबाईल सेवेवर आधारीत आहे. ग्राहकाला इंटरनेटद्वारे व्हर्चुअल अॅड्रेस तयार करावा लागतो आणि त्यातून पैशांची देवाणघेवाण होते. या अॅपद्वारे रक्कम पाठवणे आणि रक्कम मागवणे हे दोन पर्याय असतात. त्याद्वारेच रक्कम मागवून हा घोटाळा झाला.
ऑनलाईन व्यवहार वाढवण्यासाठी सरकार एकीकडे मोठ्या प्रमाणात जाहीरत बाजी करते आहे. मात्र हा घोटाळा सुरक्षिततेचे धिंडवडे काढणारा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement