एक्स्प्लोर
500 आणि 1000 च्या नोटांच्या तुटवड्यावर ई-वॉलेटचे पर्याय
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हातात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा चालत नसल्यामुळे ग्राहकांना नोहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. पण डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून खर्च करण्यासाठी विविध कंपन्यांनी पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
आज 10 नोव्हेंबरपासून देशभरातील बँकामधून नव्या पाचशे आणि हजारच्या नोटांचं वितरण सुरु झालं आहे. पण पुरेशा रकमेअभावी तसंच नागरिकांच्या मोठ्या रांगांमुळे आजही अनेकांना पैसे मिळू शकलेले नाहीत. बँकांमध्ये नागरिकांची गर्दी पुढील काही दिवस राहणार आहे आणि बँकांकडून मिळणारी रक्कमही मर्यादित असेल. त्यामुळे आपले खर्च भागवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी डिजीटल वॉलेटचा पर्याय सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.
पेटीएम
ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या (डिजिटल पेमेंट कंपनी) वापर आर्थिक व्यवहारांसाठी करता येऊ शकतो. पेटीएमकडून अनेक आकर्षक ऑफर्सही ग्राहकांना देण्यात येत आहेत. या वॉलेटद्वारे रिचार्ज, विविध बिलांचा भरणा, बस बुकिंग, सिनेमा तिकीट बुकिंग, आयआरसीटीसी बुकिंग, विमानाचं तिकीट, आर्थिक देवाण-घेवाण करणं सहज शक्य आहे.
फ्रीचार्च
फ्रीचार्ज वॉलेटच्या माध्यमातूनही आर्थिक व्यवहार करणं शक्य आहे. डिजीटल वॉलेट बहुतांश ठिकाणी स्वीकारली जातात. या वॉलेटमध्ये क्रेडीट किंवा डेबिट कार्ड, तसंच नेटबँकिंगने पैसे भरता येतात. वॉलेटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक ऑफर्सही दिल्या जातात. या वॉलेटद्वारे रिचार्ज, विविध बिलांचा भरणा, बस बुकिंग, सिनेमा तिकीट बुकिंग, विमानाचं तिकीट, आर्थिक देवाण-घेवाण करणं सहज शक्य आहे.
मोबिक्विक
मोबिक्विक वॉलेटच्या माध्यमातून रिचार्च, बिल भरणा, बस बुकिंग, विविध वेबसाईटवर पेमेंट तसंच सुपरमार्केटमध्येही या वॉलेटच्या माध्यमातून खरेदी करता येते. यात बिग बाजार, बुक माय शो, बिग बास्केटवरची बिल देण्यासाठी मोबिक्विक खूप चांगला पर्याय आहे.
ऑक्सिजन वॉलेट
ऑक्सिजन वॉलेट अनेक ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या कंपन्यांकडून वापरलं जातं. यात शॉपक्लुझ, बुक माय शो, आयआरसीटीसी बुकिंग, या सेवांचा समावेश आहे. तसंच ऑक्सिजन वॉलेटच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाणही शक्य आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement