Doodle for Google 2022: गुगलची 'डूडल' स्पर्धा, कोलकाताचा श्लोक ठरला विजेता
Doodle for Google 2022: बालदिनानिमित्त सर्च इंजिन गुगलने आपल्या होमपेजवर टायटलऐवजी खास डूडल डिस्प्ले केले आहे. गुगल नेहमीच वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने असे डूडल डिस्प्ले करत असतो.
गुगल दरवर्षी डूडल स्पर्धेचे आयोजन करते. ज्यामध्ये लहान मुलांना त्यांची कल्पनाशक्ती आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. डूडल फॉर गुगल स्पर्धेसाठी यंदा देशभरातील 1,15,000 मुलांनी भाग घेतला होता. त्यापैकी सर्वोत्तम डूडल निवडण्यासाठी ऑनलाइन मतदान करण्यात आले. कोलकाताचा विद्यार्थी श्लोक मुखर्जीच्या एंट्रीला विजेते म्हणून सर्वाधिक मते मिळाली. त्यानंतर त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.
गुगलने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशभरातील 100 शहरांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गुगल डूडल बनवण्याची संधी दिली. यंदाच्या स्पर्धेची थीम ‘कसा असेल माझा भारत पुढील 25 वर्षांत?’ ठेवण्यात अली होती. मुलांनी डूडलमध्ये 25 वर्षांनंतर भारताची कल्पना कशी केली आणि त्यांना कोणते बदल बघायचे आहेत, हे दाखवले. श्लोकने आपल्या चित्रात विज्ञान आणि निसर्ग यांच्यातील समतोल दाखवला आणि योग-आयुर्वेदाचाही समावेश त्यांनी आपल्या डूडल चित्रात केला आहे.
श्लोकने त्याच्या डूडलला 'India on the cenyter stage' असे शीर्षक दिले आहे. आपल्या डुडलबद्दल श्लोक म्हणाला आहे की, “पुढील 25 वर्षात, माझ्या भारतामध्ये शास्त्रज्ञ मानवतेच्या भल्यासाठी स्वतःचा इको-फ्रेंडली रोबोट विकसित करतील. भारताचा पृथ्वी ते अंतराळात नियमित अंतराळ प्रवास असेल. भारत योग आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात अधिक विकसित होईल आणि येत्या काही वर्षांत अधिक मजबूत होईल.”
दरम्यन, चार वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. डूडल फॉर गुगल स्पर्धेत विजेते म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांना गुगलकडून 30,000 डॉलर्स (सुमारे 24 लाख रुपये) शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय त्यांना त्यांच्या डूडल आर्टसह एक टी-शर्ट, एक Google Chromebook आणि एक डिजिटल डिझाइन टॅबलेट देण्यात येते.