एक्स्प्लोर
48 ग्राहकांचा 'पेटीएम'ला 6 लाखांना गंडा, 15 जणांविरोधात गुन्हा
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर कॅशलेस व्यवहार वाढताना दिसत आहेत. 'पेटीएम' या डिजीटल वॉलेट कंपनीला मात्र काही ग्राहकांनीच गंडा घातला आहे. पेटीएमला तब्बल 6 लाख 15 हजार रुपयांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे.
सीबीआयने कलकाजी, गोविंदपुरा आणि साकेत येथील काही नागरिकांसह पेटीएमशीच संबंधित असलेल्या 'वन 97 कम्युनिकेशन्स' या कंपनीच्या अज्ञात अधिका-याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पेटीएमचे अधिकारी एम. शिवकुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सीबीआयने या प्रकरणी थेट तक्रार दाखल करून घेऊन तातडीने तपासाला सुरूवातही केलीय. साधारणपणे सीबीआय केंद्र किंवा राज्य सरकारच्या विनंतीवरून किंवा उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच एखाद्या प्रकरणाचा तपास सुरू करतं. मात्र इथे एका परकीय गुंतवणूक असलेल्या खाजगी कंपनीच्या थेट तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
काही वेळा सामान्य नागरिकांच्या शासकीय किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या लाचखोरीसारख्या तक्रारींचा तपासही सीबीआयकडून केला जातो.
सीबीआयच्या प्रवक्त्याने यापूर्वीही अशाप्रकारे अशा अनेक खाजगी तक्रारींचा तपास सीबीआयने केला असल्याचं स्पष्ट केलं. मात्र फक्त सहा लाख रूपयांच्या फसवणुकीचा तपास देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सीबीआयने करावा का याविषयीही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे प्रकरण ?
एखाद्या ग्राहकाला खराब उत्पादन मिळाल्यास त्यांना नुकसानभरपाईचे पैसे देणे तसेच तो डिफेक्टिव्ह पीस ग्राहकाकडून परत घेऊन संबंधित व्यापाऱ्याकडे पोहचवणे, हे 'वन 97 कम्युनिकेशन्स' कंपनीच्या कामाचे स्वरुप असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह टीमद्वारे हे काम केलं जातं. त्यासाठी त्यांना आयडी आणि पासवर्ड दिले जातात, त्याद्वारेच ते नुकसानभरपाई व इतर कामे पूर्ण करतात.
2014 ते 2016 या कालावधीत 48 प्रकरणांमध्ये ग्राहकांनी मागवलेल्या वस्तू डिलीव्हरही करण्यात आल्या आणि नुकसानभरपाईची रक्कमही त्यांना देण्यात आली. म्हणजेच ग्राहकांना त्यांनी मागवलेलं उत्पादन मिळालं, ते सदोष असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रिफंडही मिळालं आणि ते उत्पादन कंपनीने ग्राहकांकडून परत घेतलंही नाही, अस एम. शिवकुमार यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
या सर्वांना मिळून 6 लाख 15 लाख रुपये देण्यात आले. याप्रकरणी सीबीआयने कलकाजी, गोविंदपुरा आणि साकेतमधल्या नागरिकांसह पेटीएमशी संबंधित कंपनीच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर पेटीएमच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो झळकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मात्र कॅशलेस व्यवहारांना ग्राहकांनी दिलेल्या पसंतीमुळे पेटीएमचा व्यवहार वाढलाही आहे आणि यूझर्सची संख्या देशभरात दहा कोटींच्या घरात पोहचली आहे.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांकडून पेटीएमद्वारे 200 रुपयांची संत्री खरेदी
पेटीएम म्हणजे पे टू मोदी : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement