Car Tips : वर्षानुवर्षे कार सुरळीत चालवायची आहे? मग या 'पाच' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
Car Tips :आपली कार अनेक वर्षे सुरळीत चालावी यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टी.
Car Tips : काही जणांची कार चालवण्याची पध्दत ही त्यांच्या मर्जीप्रमाणे असते. काही नवीन ड्रायव्हर असतील तर काही जुने ड्रायव्हर असतील, प्रत्येकाची पध्दत ही वेगळी असते. ते स्वत:ला हवी तशी कार चालवतात. मग त्याचा मेन्टेनन्स खर्चही वाढतो. पण असे काही उपाय आहेत की ज्यांमुळे तुमच्या कारच्या मेन्टेनन्सवर तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही आणि त्यामुळे पैशाचीही बचत होईल.
एक्सेलेटर आणि ब्रेकचा वापर आरामात करा
एक्सेलेटर आणि ब्रेक आप्तकालीन घटनेच्या वेळी वापरल्यास ते काहीवेळेस योग्य ठरते. मात्र काहींना उगाचच एक्सेलेटर आणि ब्रेक दाबण्याची सवय असते. असे जर आपण सारखे केले तर त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होण्यास सुरवात होते व कार मध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून शक्यता योग्य वेळी यांचा वापर केल्यास आपली कार व आपण सुरक्षित राहू शकतो.
कारमधून येणाऱ्या बारीक आवाजाकडे दुर्लक्ष करू नका
बऱ्याचदा मध्येच कधीतरी कार मधून आवाज येण्यास सुरवात होतो. हा आवाज छोटा असल्यास त्याने काय होणार आहे, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण असे करणे टाळावे. असा लहान-मोठा आवाज आल्यास आपण गॅरेजमध्ये कार दुरूस्त करण्यास द्यावी. आपण याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला कारच्या बाबतीत अनेक समस्या उध्दवू शकतात व खर्च सुध्दा वाढू शकतो.
कार कशाप्रकारे वापराल?
काही जण कारचे खूप शौकीन असतात. त्यामुळे जुने मॅाडेल विकून नवीन मॅाडेल घेतात. तर काही जणांकडे दोन-चार गाड्या असतात. पण त्यातली ते एकच कार वापरतात. मग त्यावेळेस आपली जुनी कार तशीच एका साईडला पडून असते. पण आपण बराच वेळ वापराविना पडलेली कार तशीच ठेवली तर कारमधील आतील पार्ट्स खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण वापरत नसलेली कार देखील आपण आठवड्यातून एकदा तरी चालवावी. त्यामुळे आपली कार एकप्रकारे नीट व सुरळीत चालू राहील.
कारच्या चावीवर वजनदार वस्तूचे किचन लावणे टाळावे
कारच्या चावीवर शक्यतो जास्त वजनाचे किचन किंवा इतर चाव्यांचा गुच्छा लावणे टाळावे. त्यामुळे कारच्या इंजिनवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंजिनेशनचे बिघाड होऊ शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे.
कारच्या स्टेअरिंगची अशी काळजी घ्या
लहान मुलांना कारच्या स्टेअरिंगशी खेळायला आवडते. कार बंद असली कारची स्टेअरिंग इथे तिथे करायचे अशी सवय लहान मुलांना असते. जर आपली कार बंद असेल तर कारच्या स्टेअरिंग फिरवायचे नाही. त्याचा वाहन चालवताना परिणाम होऊ शकतो. शिवाय कार चालवताना ड्रायव्हरला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
संबंधित बातम्या :