एक्स्प्लोर

Aster | भारतात पहिली पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर' एमजीकडून सादर

एमजीने भारतात पहिली पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर' सादर केली आहे. फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल 2 तंत्रज्ञानाची सुविधा यात देण्यात आली आहे.

मुंबई : एमजी मोटर इंडियाने आज आगामी मिड साइज एसयूव्ही अॅस्टर (Astor) मध्ये समाविष्ट असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल 2 तंत्रज्ञानाचे अनावरण केले. संधी आणि सेवांच्या कार-अॅझ अ प्लॅटफॉर्म (CAAP) च्या संकल्पनेवर आधारीत ऑटो-टेक घटकावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट एमजीने ठेवले आहे.

एमजी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या नवोदित तंत्रज्ञानावर काम करत आहे. जेणेकरून ग्राहकांसाठीच्या सेवा आणि सबक्रिप्शनचा विकास तसेच कार्यान्वयन होईल. त्यासोबतच त्यांच्या ‘ऑन-डिमांड इन-कार’ गरजा पूर्ण करता येतील. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय असिस्टंट मिळालेली अॅस्टर ही पहिलीच कार आहे.

पर्सनल एआय असिस्टंट हे प्रसिद्ध अमेरिकन फर्म ‘स्टार डिझाइन’ने तयार केले आहे. यात मानवासारख्या भावना आणि आवाज काढले जातात. तसेच विकिपीडियाद्वारे प्रत्येक विषयावर तपशीलवार माहिती मिळते. हे तंत्रज्ञान कारमधील लोकांशी जोडले जाईल. त्यात आय-स्मार्ट हबची सुविधाही आहे. या प्लॅटफॉर्मवर CAAP च्या पार्टनरशिप, सेवा आणि सबक्रिप्शन असेल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या सेवांचा समूह पर्सनलाइज करण्याची संधी मिळेल.

Aster | भारतात पहिली पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर' एमजीकडून सादर

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव छाबा म्हणाले, की “ऑटो-टेक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच यशस्वी तंत्रज्ञान आधी सादर केले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही आम्ही पुढे जात आहोत. अॅस्टर ही एक पाऊल पुढे असून ग्राहकांना प्रीमियम/लक्झरी सेगमेंटमध्येच मिळणाऱ्या इंडस्ट्री फर्स्ट आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्यांसह एक क्रांती घडवून आणेल. उत्पादनांच्या केंद्रस्थानी असलेल्या नूतनाविष्कार आणि सॉफ्टवेअरच्या अखंड पाठपुराव्यामुळे, आमची वाहने एआयचा लाभ घेत अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देत राहतील.”

ऑटोनॉमस लेव्हल 2 एमजी अॅस्टर ही मिड रेंज रडार आणि मल्टी पर्पज कॅमेऱ्याची सुविधेने युक्त असल्याने, यात (एडीएएस) अर्थात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टिमच्या मालिकेचा अनुभव घेता येऊ शकतो. यात अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी बँकिंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन डिपार्चर प्रिव्हेन्शन, इंटेलिजंट हँडलँप कंट्रोल, रिअर ड्राइव्ह असिस्ट आणि स्पीड असिस्ट सिस्टीम आदींचा समावेश आहे. या सुविधांद्वारे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होऊ शकते. भारतातील वाहतुकीच्या दृष्टीने ते अधिक अनुकूल करण्यात आले आहे.

भारतात प्रथमच एमजीने अनेक संधींसह CAAP चे सादरीकरण केले आहे. विविध इन-कार सेवांची यंत्रणा तयार करत हे सबक्रिप्शन्स आणि सेवांना होस्ट करते. यात मॅपमायइंडियासोबत नकाशे व नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोईनअर्थद्वारे ब्लॉकचेन संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट आणि इतर बऱ्याच सुविधा समाविष्ट आहेत. एमजीच्या कारमालकांना जिओसावन अॅपवर म्युझिक ऐकता येईल आणि कारमध्ये हेट युनिटद्वारे (पार्क+द्वारे समर्थित - सुरुवात करण्यासाठी शहरांची निवड करावी) पार्किंग स्लॉट आरक्षित करण्याचे इंडस्ट्रीतील पहिले वैशिष्ट्य देण्यात आले आहे. CAAP मध्ये कालांतराने अनेक संधी विकसित होतील. याद्वारे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget