Electric Cars : इलेक्ट्रिक कारला फुल चार्जिंगसाठी किती खर्च? एका चार्जमध्ये किती धावते?
इलेक्ट्रिक वाहन दोन प्रकारे चार्ज केले जाऊ शकते. यात फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे बॅटरी 60 ते 110 मिनिटांत चार्ज होऊ शकते.
मुंबई : देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडेही वळत आहेत. देशातील मोठ्या संख्येने लोक इलेक्ट्रिक कारची खरेदी करतान दिसत आहेत. त्याचबरोबर सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहे आणि इलेक्ट्रिक स्टेशन बांधत आहे. अशा परिस्थितीत, बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की इलेक्ट्रिक कार पूर्णपणे चार्ज करण्यासाठी किती वेळ आणि पैसा लागतो, इलेक्ट्रिक चार्जिंगचा दर काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.
चार्जिंग दर काय आहे?
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग दराबद्दल बोलायचे तर मुंबईच्या तुलनेत दिल्लीतील दर कमी आहेत. मुंबईत गाडी चार्ज करण्यासाठी 15 रुपये प्रति युनिट आकारले जात आहेत. तर दिल्लीमध्ये लॉन टेन्शन वाहनांसाठी 4.5 रुपये प्रति युनिट आणि हाय टेन्शन वाहनांसाठी 5 रुपये प्रति युनिट आकारले जाते. संपूर्ण वाहन चार्ज करण्यासाठी 20 ते 30 युनिट लागतात. अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये 120 ते 150 रुपयांमध्ये वाहन पूर्णपणे चार्ज करता येते. त्याचबरोबर मुंबईत त्याची किंमत 200 ते 400 रुपये आहे.
Ola Electric Scooter Launch: ओला स्कूटर भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फीचर
गाडी चार्ज करण्यासाठी किती वेळ लागतो?
इलेक्ट्रिक वाहन दोन प्रकारे चार्ज केले जाऊ शकते. यात फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे बॅटरी 60 ते 110 मिनिटांत चार्ज होऊ शकते. तर स्लो चार्जिंग किंवा पर्यायी चार्जिंगला 6 ते 7 तास लागतात.
एकदा चार्ज केल्यावर गाडी किती लांब जाते?
सिंगल चार्जवर कार किती अंतरावर चालेल हे त्याच्या इंजिनवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, 15 KMH बॅटरीसह, कार 100 किलोमीटर धावू शकते. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीनुसार, किती अंतर कापले जाऊ शकते याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तर काही टेस्ला कार एकदा चार्ज केल्यावर 500 किमी पर्यंत धावतात.