एक्स्प्लोर
एमटीएनएलला दुसऱ्या तिमाहीत तब्बल 731 कोटीचा तोटा
सार्वजनिक क्षेत्रातील टेलिफोन कंपनी एमटीएमएलला चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबरदरम्याच्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल 730.64 कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन आणि इतर भत्ते यांमुळे हा तोटा झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिफोन कंपनी एमटीएमएलला चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबरदरम्याच्या दुसऱ्या तिमाहीत तब्बल 730.64 कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन आणि इतर भत्ते यांमुळे हा तोटा झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी 2016-17 आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर दरम्यान 768.32 कोटीचा तोटा झाला होता.
चालू तिमाहीत कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेलं वेतन आणि इतर भत्ते 623.19 कोटी होतं. पण एक वर्षापूर्वी म्हणजे 2016-17 च्या तिमाहीत हा आकडा 699 कोटी रुपये होता.
चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर दरम्यान कंपनीच्या उत्पन्नातही 9 टक्क्यांची घट झाली आहे.
चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न 791.1 कोटी रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत हा आकडा 870.98 कोटी रुपये होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement