Best Offers : सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर; पाहा किंमत
सॅमसंग कंपनीने महागडे स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर या टीव्हींवर मोठी सूट मिळत आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्ट टीव्हीची क्रेझ वेगाने वाढत आहे. आपण देखील नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे आता स्वस्त किंमतीत एक चांगला ब्रँडेड स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आपण हे टीव्ही ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) येथून खरेदी करू शकता. Infinix, Nokia, Motorola, Oneplus, Thomson, TCL, Mi, Realme, LG, Sony, Kodak, Toshiba आणि Samsung या सारख्या ब्रँडचे स्मार्ट टीव्ही येथे अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यामध्ये आपण 32 ते 65 इंचांपर्यंतचे टीव्ही घरी आणू शकता. जर बेस्ट डील बद्दल बोलायचं तर सॅमसंग टीव्हीवर चांगल्या ऑफर आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
32 इंची स्मार्ट टीव्ही किंमत
अॅमेझॉनवर तुम्हाला ऑफरअंतर्गत सॅमसंगचा 32 इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही 2020 एडिशन 17,299 रुपयांमध्ये मिळत आहे. दुसरीकडे, सॅमसंगचा दुसरा 32 इंच Wondertainment सीरिज एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही केवळ 17,799 रुपयात मिळत आहे.
43 इंची स्मार्ट टीव्ही किंमत
फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या-43 इंचाच्या Crystal 4K 43 inch Ultra HD 4K LED स्मार्ट टीव्हीवर 20 टक्के सूट देण्यात येत आहे, त्यानंतर त्याची किंमत 36,999 रुपये होत आहे. याशिवाय सॅमसंगच्या अन्य 43 इंचाच्या फुल एचडी एलईडी स्मार्ट टीव्हीवर 17 टक्के सूट मिळत आहे. त्यानंतर हा टीव्ही आपण फक्त 31,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता.
55 आणि 65 इंचाची स्मार्ट टीव्ही किंमत
याशिवाय सॅमसंगचा 55 इंचाचा Crystal 4K Pro Series Ultra HD स्मार्ट एलईडी टीव्ही 2021 चा मॉडेल 54,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. तसेच सॅमसंगच्या 65 इंचाचा Crystal 4K Series Ultra HD स्मार्ट एलईडी टीव्ही 2021 ची किंमत 85,999 रुपये आहे.
इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
