एक्स्प्लोर
SD कार्ड लॉक झालंय? अनलॉक करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
मायक्रो एसडी कार्डमध्ये लोकांचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ, फोटो आणि फायली आहेत. ते लॉक झाल्यावर हा डाटा जाण्याचा धोका असतो. परंतु, SD कार्ड अनलॉक करणे सोपे आहे.
![SD कार्ड लॉक झालंय? अनलॉक करण्यासाठी या टिप्स फॉलो करा SD card is locked, follow these tips and unlock it SD कार्ड लॉक झालंय? अनलॉक करण्यासाठी या टिप्स फॉलो करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/27/066f740549585af385d089ce821fbf07_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांकेतिक छायाचित्र
आता स्मार्टफोनमध्ये इन बिल्ट स्टोरेज कंपन्यांकडून वाढवण्यात आल्याने पूर्वीसारखे मायक्रो एसडी कार्ड्स (Micro SD Card) वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तरीही अद्याप मायक्रो एसडी कार्ड मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. फोन व्यतिरिक्त, एसडी कार्ड डीएसएलआर कॅमेरा किंवा व्हिडिओ कॅमेर्यामध्ये देखील असते.
बर्याच कारणांमुळे SD कार्ड लॉक होतात. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की त्यामध्ये असलेल्या आवश्यक फोटो-व्हिडिओ किंवा कागदपत्रांचे काय होईल. आपले SD कार्ड लॉक केलेले असल्यास घाबरू नका. हे सहजपणे अनलॉक केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत.
- मायक्रो एसडी कार्ड अनलॉक करण्यासाठी आपल्याला विंडोज कम्प्यूटर वापरावा लागेल. यानंतर आपल्याला या स्टेप्सला फोलो करावे लागेल.
- विंडोज संगणकावर एसडी कार्ड कनेक्ट करा. यासाठी कार्ड स्लॉट किंवा अॅडॉप्टर वापरा.
- आता Windows आणि R keys एकाचवेळी दाबा, अॅडमिनिस्ट्रेटर रन कमांड येऊ द्या.
- आता प्रत्येक कमांडवर आलेल्या एंट्री वर एंटर दाबा.
- ‘Attributes Disk Clearonly’ ऑप्शन दिसल्यानंतर एंटर प्रेस करा.
- आता आपल्याला ‘Disk Attributes Cleared Successfully’ दिसेल. याचा अर्थ आपली डिस्क अनलॉक झाली आहे.
- लक्षात ठेवा की ही प्रोसेस करताना आपल्याला प्रत्येक कमांड काळजीपूर्वक पाहिल्यानंतर एंटर दाबावे लागेल, जेणेकरून आपल्या फायली सुरक्षित असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)