एक्स्प्लोर
अॅपल Xs आणि Xs मॅक्स लाँच, जगातला सर्वात वेगवान फोन असल्याचा दावा
अॅपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये आयफोनसह अॅपल वॉच 4 आणि इतर डिव्हाईसही लाँच केले. मात्र सर्वांना प्रतिक्षा होती ती नव्या आयफोनची.
Apple Event 2018 : अॅपलने यावर्षी आयफोन Xs आणि Xs मॅक्स लाँच केला आहे. अॅपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये आयफोनसह अॅपल वॉच 4 आणि इतर डिव्हाईसही लाँच केले. मात्र सर्वांना प्रतिक्षा होती ती नव्या आयफोनची.
अॅपल वॉच 4 ची स्क्रीन या अगोदरच्या वॉचपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. तर किंमत 399 डॉलर (28 हजार 700) आणि 499 डॉलर (35 हजार 900) अशी असेल. या वॉचला 18 तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. तर अगोदरच्या मॉडलच्या तुलनेत यामध्ये सहा बदल करण्यात आल्याचंही कंपनीने आपल्या इव्हेंटमध्ये सांगितलं. 14 सप्टेंबरपासून या वॉचची बुकिंग करता येईल, तर 21 सप्टेंबरपासून विक्री सुरु होईल.
कसे आहेत अॅपलचे नवे फोन?
अॅपलने लाँच केलेल्या दोन्ही फोनमध्ये हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 5.8 इंच आणि 6.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर इंटर्नल स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
नव्या आयफोनची कॅमेरा क्वालिटी खास असणार आहे. आयफोन Xs मध्ये देण्यात आलेल्या 6 कोअर प्रोसेसरमुळे हा फोन 30 टक्के वेगवान असेल, असा दावा कंपनीने केलाय. तर आयफोन Xs चं मोठं व्हेरिएंट आयफोन Xs मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
नवे आयफोन आणि इतर डिव्हाईसची सर्व माहिती लवकरच समोर येईल. शिवाय नव्या आयफोनची भारतात किंमत काय असेल, याबाबतही उत्सुकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement