एक्स्प्लोर
आयफोन 8 ची भारतात निर्मिती, 'मेक इन इंडिया'मुळे दर स्वस्त?
मुंबई : जगप्रसिद्ध अॅपल कंपनी बंगळुरुमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी थाटण्याच्या तयारीत आहे. आयफोनची आगामी आवृत्ती अर्थात आयफोन 8 च्या डिव्हाईसला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते. त्याचमुळे 'मेक इन इंडिया' आयफोन 8 च्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एप्रिलच्या सुमारास आयफोन 8 चं भारतातील मॅन्युफॅक्चरिंग सुरु होण्याची चिन्हं आहेत. याबाबत अद्याप चर्चा असून अॅपल कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही. मात्र सुरुवातीच्या काळात अॅपलची मोजकी गॅजेट्स बंगळुरुत तयार होतील, त्यानंतर हळूहळू प्रॉडक्शनचा विस्तार होईल, असा अंदाज आहे.
सध्याच्या घडीला आयात कर आणि जकात म्हणून अॅपल भारतात मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रॉडक्शन खर्चाच्या 12 टक्के रक्कम भरते. या रकमेमुळे भारतात विकल्या जाणाऱ्या आयफोनच्या किंवा एकंदरित अॅपल डिव्हाईसेसच्या किमतीत वाढ होते. त्यामुळे इतर कंपनींच्या उत्पादनांच्या तुलनेत अॅपलची उत्पादनं महाग ठरतात.
भारतातच या उत्पादनांची निर्मिती झाल्यास अतिरिक्त खर्च निघून जाईल. त्यामुळे साहजिकच आयफोनच्या किमतीत घट होईल. स्थानिक अधिकृत आयफोन सेंटरमधूनच ग्राहकांना उत्तम सेवा आणि रिपेअरिंग सर्व्हिस मिळण्याची शक्यताही अधिक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement