एक्स्प्लोर

iPhone 14 : ‘आयफोन 14’ सिरीजच्या लाँचची चर्चा! जाणून घ्या कधी बाजारात येणार अ‍ॅपलचा नवा फोन..

iPhone 14 : आयफोन म्हटलं की, प्रत्येकालाच या फोनचं कुतूहल वाटतं. आता अ‍ॅपल कंपनी त्यांचा नवा आयफोन लवकरच बाजारात आणणार आहे.

iPhone 14 : फोन निर्मात्या कंपन्यांसाठी नव्या फोन्सची काही गुपिते लपवून ठेवणे खरंच कठीण असते. टेक बाजारात नेहमीच चर्चेत असणारे फोन बाजारात लाँच होण्यापूर्वीच लीक झालेल्या फीचर्समुळे ग्राहकांना आकर्षित करतात. आयफोन 14च्या (iPhone 14) बाबतीतही सध्या असेच घडते आहे. आयफोन म्हटलं की, प्रत्येकालाच या फोनचं कुतूहल वाटतं. आता अ‍ॅपल कंपनी त्यांचा नवा आयफोन लवकरच बाजारात आणणार आहे. नेहमीप्रमाणेच कंपनी या सिरीजमध्येही iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच करेल, असे म्हटले जात आहे. मात्र, हे नवे फोन्स बाजारात येण्यापुर्वीच त्यांच्याबद्दलच्या अनेक चर्चा सरू आहेत.

कधी आयफोन 14ची किंमत लीक होते, तर कधी फोटो. आयफोनचे ग्राहक देखील या अपडेट मिळवण्यासाठी आतुर असतात. प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी त्यांचा बहुचर्चित आयफोन 14 येत्या सप्टेंबर महिन्यात बाजारांत आणेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हा फोन बाजारात येण्याआधीच त्याच्या विषयी अनेक चर्चा सुरु आहेत.

कधी होणार लाँच?

आता आयफोन म्हटलं की चर्चा तर होते. मात्र, आयफोन 14 सिरीज नेमकी केव्हा लाँच होणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. याआधी अ‍ॅपल कंपनीने त्यांचे नवे फोन सप्टेंबर महिन्याच्या आसपासच लाँच केल्याने आता ही नवी सिरीज देखील सप्टेंबर 2022मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. लाँचची अधिकृत घोषणा होताच, अमेरिका आणि युरोपमधील लोक त्याचे प्री-बुकिंग करू शकतील. त्यानंतर 2 ते 3 आठवड्यांत हा फोन त्यांना मिळू शकेल. इतर, देशांना मात्र थोडी वात पहावी लागू शकते.

काय असेल किंमत?

सध्या या फोनच्या किंमतीचा देखील अंदाज लावला जाता आहे. iPhone 13 Pro आणि 13 Pro Max ची किंमत अनुक्रमे 1,000 डॉलर (77,640 रुपये) आणि 1,100 डॉलर (85,375 रुपये) इतकी आहे. हीच किंमत गृहीत धरल्यास, आयफोन 14 सिरीजची किंमत देखील या किंमतीच्या आसपास असू शकते.

फीचर्स लीक

iPhone 14 Max मध्ये 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.68-इंच फ्लेक्सिबल OLED स्क्रीन, 458 पीपीआयसह 2778×1284 पिक्सेलचे रिझोल्यूशन असणार आहे. याशिवाय, या iPhone मध्ये प्रोसेसरसाठी 5nm TSMC चा A15 Bionic चिपसेट वापरला जाऊ शकतो, जो 6GB LPDDR4X रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल. Phone 14 Max च्या कॅमेरा सेटअपमध्ये मगील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, 12MPचे दोन कॅमेरे असतील. मात्र, या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा आयफोन फेस आयडी आणि नॉच फीचरसह बाजारात येऊ शकतो.

आयफोन 14 प्रोमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.06-इंच फ्लेक्सिबल OLED स्क्रीन असेल. हा डिस्प्ले 2532×1170 रिझोल्यूशन आणि 460 PPI सह येईल. या फोनमधील प्रोसेसरसाठी 4nm TSMC चा A16 बायोनिक चिपसेट वापरला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 6GB LPDDR5 रॅम असण्याची शक्यता आहे. 128GB, 256GB, 512GB, 1TB अशा चार स्टोरेज पर्यायात हा फोन उपलब्ध असेल. आयफोन 14 प्रोमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकत, ज्यात प्रायमरी कॅमेरा 48MP  आणि अपर्चर F/1.3 असण्याची अपेक्षा आहे. तर, त्याचा सेकेंडरी आणि तिसरा कॅमेरा 12-12MP चा असू शकतो. या फोनमध्ये टायटॅनियम अलॉय फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो.

iPhone 14 Pro चा लूक लीक

लीक करण्यात आलेल्या माहितीनुसार आयफोन 14 प्रो जांभळ्या रंगात असेल. तसेच या आयफोनमध्ये सोनेरी आणि चंदेरी रंगाचा पर्यात उपलब्ध असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या आयफोन 14 प्रोमध्ये डिस्पेवर नॉनऐवजी पंच-होल आणि गोल कटआऊट डिझाइन असेल. शिवाय डिस्पेमध्ये अरुंद बेझल्स असतील यामुळे या आयफोनला अधिक पॉलिश लूक मिळेल असा अंदाज आहे.

संबंधित इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wadettiwar On Pune Drugs : कोणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही, विजय वडेट्टीवार सभागृहात आक्रमकSambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हौदास; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Embed widget