iPhone 14 Specs Revealed : अधिकृत लाँचिंग पूर्वीच आयफोन 14चे फीचर्स लीक, पाहा कसा असणार नवा iPhone 14
iPhone 14 Specs : आता अॅप्पल कंपनी त्यांचा नवा आयफोन लवकरच बाजारात आणणार आहे. मात्र, हे फोन बाजारात येण्यापूर्वीच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.
iPhone 14 Specs : आयफोन म्हटलं की, प्रत्येकालाच या फोनचं कुतूहल वाटतं. तंत्रज्ञान सतत अपडेट होत असताना, आयफोन मागे राहील, हे जवळजवळ अशक्यच! आता अॅप्पल कंपनी त्यांचा नवा आयफोन लवकरच बाजारात आणणार आहे. नेहमीप्रमाणेच कंपनी या सिरीजमध्येही iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच करेल, असे म्हटले जात आहे. मात्र, हे फोन बाजारात येण्यापूर्वीच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.
या नव्या फोनमध्ये कोणते नवे फीचर्स असणार? तो कसा दिसणार? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, आता अधिकृत लाँचिंग पूर्वीच आयफोन 14चे फीचर्स लीक झाले आहेत. एका ट्विटर युझरने या फोनचे स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत.
कसा असणार नवा आयफोन 14 मॅक्स?
टेकस्टार ‘सॅम’ने त्याच्या ट्विटर आयडी @Shadow_Leak द्वारे iPhone 14 सीरीजबद्दल ही माहिती दिली आहे. त्याने या ट्विटमध्ये आयफोन 14 मॅक्सचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत. iPhone 14 Max मध्ये 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.68-इंच फ्लेक्सिबल OLED स्क्रीन, 458 पीपीआयसह 2778×1284 पिक्सेलचे रिझोल्यूशन असणार आहे. याशिवाय, या iPhone मध्ये प्रोसेसरसाठी 5nm TSMC चा A15 Bionic चिपसेट वापरला जाऊ शकतो, जो 6GB LPDDR4X रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल.
Phone 14 Max च्या कॅमेरा सेटअपमध्ये मगील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, 12MPचे दोन कॅमेरे असतील. मात्र, या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा आयफोन फेस आयडी आणि नॉच फीचरसह बाजारात येऊ शकतो. IPhone 14 maxच्या 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत USD 899 (सुमारे 69,182 रुपये) असेल, असे यात म्हटले गेले आहे.
आयफोन 14 प्रोचे स्पेसिफिकेशन लीक
या ट्विटर अकाऊंटवरून आयफोन 14 प्रोचे स्पेसिफिकेशन देखील सांगण्यात आले आहेत. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.06-इंच फ्लेक्सिबल OLED स्क्रीन असेल. हा डिस्प्ले 2532×1170 रिझोल्यूशन आणि 460 PPI सह येईल. या फोनमधील प्रोसेसरसाठी 4nm TSMC चा A16 बायोनिक चिपसेट वापरला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 6GB LPDDR5 रॅम असण्याची शक्यता आहे. 128GB, 256GB, 512GB, 1TB अशा चार स्टोरेज पर्यायात हा फोन उपलब्ध असेल.
आयफोन 14 प्रोमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकत, ज्यात प्रायमरी कॅमेरा 48MP आणि अपर्चर F/1.3 असण्याची अपेक्षा आहे. तर, त्याचा सेकेंडरी आणि तिसरा कॅमेरा 12-12MP चा असू शकतो. या फोनमध्ये टायटॅनियम अलॉय फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. iPhone 14 Pro च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत USD 1099 म्हणजेच सुमारे 84,573 रुपये असू शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या 'समर सेल'मध्ये Samsung आणि Redmi वर मिळणार बंपर डिस्काउंट; पाहा खास ऑफर
- Amazon Summer Sale : Amazon सेलवर मिळतेय वन प्लसच्या दोन नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर ऑफर; वाचा सविस्तर
- iPhone13 on Amazon : अॅमेझॉनच्या 'समर सेल' मध्ये iPhone 13 च्या किंमतीवर मिळणार धमाकेदार डिस्काउंट; पाहा खास ऑफर