iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro चे स्पेसिफिकेशन लॉन्च होण्यापूर्वी झाले लीक, 'एवढी' असू शकते किंमत
Apple iPhone : आगामी iPhone सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या आयफोन्सबद्दल अनेक लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत.
IPhone : अॅपलच्या नवीन आयफोन सीरिजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आगामी iPhone सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या आयफोन्सबद्दल अनेक लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत. ही नवीन आयफोन सीरीज सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
एका ताज्या अहवालानुसार, iPhone 14 Max ला 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 6GB RAM मिळू शकते, जी iPhone 13 च्या तुलनेत अपग्रेड असेल. टिपस्टर सॅमने त्याच्या ट्विटर आयडी @Shadow_Leak द्वारे iPhone 14 सीरीजबद्दल ही माहिती दिली आहे.
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, iPhone 14 Max मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.68-इंच OLED स्क्रीन, 2778×1284 पिक्सेलचे रिझोल्यूशन असण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, या iPhone मध्ये प्रोसेसरसाठी 5nm TSMC चा A15 Bionic चिपसेट वापरला जाऊ शकतो, जो 128GB आणि 256GB स्टोरेजसह 6GB LPDDR4X रॅमसह येऊ शकतो.
iPhone 14 Max च्या मागील कॅमेऱ्यात ड्युअल कॅमेरा सेटअप देऊ शकते, त्यातील पहिला कॅमेरा 12MP आणि दुसरा कॅमेरा 2MP असू शकतो. मात्र, या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टिपस्टर सॅमच्या लीक झालेल्या रिपोर्टनुसार, iPhone 14 Pro च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील माहिती मिळाली आहे. या iPhone मध्ये 6.06-इंचाची लवचिक OLED LTPO स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120H, रिझोल्यूशन 2532×1170 पिक्सेल असू शकतो. या फोनमधील प्रोसेसरसाठी 4nm TSMC चा A16 बायोनिक चिपसेट वापरला जाऊ शकतो.
याशिवाय या फोनमध्ये 6GB LPDDR5 रॅम असण्याची शक्यता आहे. आयफोन 14 प्रो मध्ये चार स्टोरेज पर्याय आहेत. ज्यामध्ये 128GB, 256GB, 512GB, 1TB स्टोरेज पर्याय असण्याची अपेक्षा आहे. तर मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असणे अपेक्षित आहे.
iPhone 14 Max Specifications
— Sam (@Shadow_Leak) May 5, 2022
• 6.68" Flexible OLED Screen
• (2778×1284) Resolution & 458 PPI
• 90Hz Refresh Rate
• A15 Bionic (5nm TSMC)
• 6GB LPDDR4X RAM
• 128GB/256GB Storage
• Dual Rear Camera (12MP+12MP)
• Face ID
• Notch
🫧 6GB+128GB: $899
आयफोन 14 प्रोचा पहिला कॅमेरा 48MP असू शकतो, ज्यामध्ये अपर्चर F/1.3 असण्याची अपेक्षा आहे. तर त्याचा दुसरा आणि तिसरा बॅक कॅमेरा 12-12MP चा असू शकतो.
सॅम नावाच्या या टिपस्टरने या दोन आयफोनच्या एका व्हेरियंटची किंमतही लीक केली आहे. टिपस्टरनुसार, iPhone 14 Max च्या 6GB + 128GB ची किंमत जवळपास 69,182 रुपये असू शकते. तर iPhone 14 Pro च्या 6GB + 128GB ची किंमत 84,573 रुपये असू शकते.