Google Password : लवकरच सर्व पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासातून सुटका! गुगल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठी घोषणा
Apple, Google and Microsoft changed password : आता Google, Apple आणि Microsoft सर्व अकाऊंट आणि सुविधांमध्ये पासवर्डशिवाय लॉग-इन करू शकणार आहेत.
Apple, Google and Microsoft changed password : आजच्या काळात आपण अनेक अॅप्स आणि सेवा वापरतो. ज्यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला पासवर्डची आवश्यकता असते. अर्थात हे पासवर्ड आपले अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी, कोणीही त्याचा गैरवापर करू नये यासाठी असतात. परंतु, हे पासवर्ड लक्षात ठेवणे खूप त्रासदायक असते. या कंपन्यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, आता Google, Apple आणि Microsoft सर्व अकाऊंट आणि सुविधांमध्ये पासवर्डशिवाय लॉग-इन करू शकणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
तुम्ही पासवर्डशिवाय लॉग इन करू शकाल
जगातील तीन आघाडीच्या टेक कंपन्या, गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी एकत्रितपणे घोषणा केली आहे की, ते एक वैशिष्ट्य घेऊन येणार आहेत. जे त्यांच्या यूजर्सना कोणत्याही पासवर्डशिवाय त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करण्यास परवानगी देते. कंपनीच्या या घोषणेला लोकांची पसंती मिळत आहे.
'या' यूजर्सना नव्या बदलाचा फायदा मिळणार आहे
गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टच्या या नवीन बदलाचा वापर प्रत्येक उपकरण आणि ऑपरेटिंग सिस्टमचे यूजर्स करू शकतील. ते म्हणतात की, अँड्रॉइड, आयओएस (IOS), क्रोम-ओएस, क्रोम ब्राउझर, एज, सफारी आणि मॅक-ओएस सारख्या सर्व प्लॅटफॉर्मचे यूजर्स या पासवर्डलेस ऑथेंटिकेशनचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही हे नवीन फीचर तुमच्या स्मार्टफोन, डेस्कटॉप, ब्राउझर डिव्हायसेस, सर्वत्र वापरू शकता.
हे फीचर्स कसे कार्य करेल ?
तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता राखून तुम्ही पासवर्डशिवाय हे वैशिष्ट्य कसे वापरू शकता. ते कसे हे समजून घ्या. या टेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पासवर्डशिवाय यूजर्स जितक्या सहजतेने त्यांचा स्मार्टफोन अनलॉक करतात तितक्याच सहजतेने त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतील. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोन पिन, पासवर्ड किंवा पॅटर्नने अनलॉक करता, त्याचप्रमाणे तुम्ही आता तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्येही लॉग इन करू शकाल.
'हा' विशेष कोड वापरावा लागेल
तुमच्या Google, Apple आणि Microsoft अकाऊंटमध्ये साइन इन करण्यासाठी, तुम्हाला एक युनिक क्रिप्टोग्राफिक टोकन किंवा FIDO (फास्ट आयडी ऑनलाइन) क्रेडेंशियल वापरावे लागेल. अशा प्रकारे, तुम्ही पासवर्डशिवाय तुमच्या खात्यात लॉग इन करू शकाल. या नवीन फीचरमुळे तुम्हाला हजारवेळा पासरव्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल. तसेच, हॅकर्ससाठी अकाऊंट हॅक करणे अधिक कठीण होईल.
गुगलने ही सुविधा 2023 पासून सुरु करण्यात येईल असेही सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- iPhone 14 Specs Revealed : अधिकृत लाँचिंग पूर्वीच आयफोन 14चे फीचर्स लीक, पाहा कसा असणार नवा iPhone 14
- Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या 'समर सेल'मध्ये Samsung आणि Redmi वर मिळणार बंपर डिस्काउंट; पाहा खास ऑफर
- Amazon Summer Sale : Amazon सेलवर मिळतेय वन प्लसच्या दोन नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर ऑफर; वाचा सविस्तर