एक्स्प्लोर
अमेझॉनचा जबरदस्त सेल, अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट
मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉननं ग्राहकांसाठी स्मार्टफोन सेल सुरु केला आहे. यामध्ये मोटोरोला, वनप्लस, अॅपल, सॅमसंग आणि इतर ब्रॅण्डच्या स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. हा सेल 19 जून ते 21 जूनमध्ये असणार आहे.
स्मार्टफोनशिवाय लॅपटॉप आणि हेडफोनवर देखील सूट देण्यात आली आहे. आयफोन 7, वनप्लस 3टी, मोटो जी5 प्लस, आयफोन एसई यासारख्या स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे.
या सेलमध्ये वन प्लस 3टी 64 जीबी स्मार्टफोन 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 13,060 रुपयांपर्यत सूट मिळू शकते.
तर आयफोन 7च्या 32 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्मार्टफोन हे अनुक्रमे 42,999 रु. 54,990 रुपये आणि 65,900 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय 13060 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही आहे. तर आयफोन 6चा 32 जीबी स्मार्टफोन या सेलमध्ये 24,999 रुपयात उपलब्ध आहे.
मोटो Z 29,999 रुपयात उपलब्ध आहे. तर यावर देखील 13060 रुपयापर्यंत एक्सचेंड ऑफर आहे.
महागड्या स्मार्टफोनसोबतच बजेट स्मार्टफोनवरही सूट देण्यात आली आहे. कूलपॅड नोट 5 लाइट 2,000 सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 6,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर सॅमसंग गॅलक्सी ऑन7 प्रो स्मार्टफोन 8,690 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement