एक्स्प्लोर
Advertisement
अमेझॉनची पुन्हा बदमाशी, तिरंग्यानंतर राष्ट्रपित्याचा अवमान
नवी दिल्ली: अमेझॉन कॅनडाने भारतीय ध्वजाची प्रतिमा असलेली पायपुसणी ऑनलाईन विक्रीला ठेवल्यानंतर, आता अमेझॉन कॅनडाने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा घोर अपमान केलाय. अमेझॉननं आता महात्मा गांधींचा फोटो असलेल्या स्लिपर्सची ऑनलाईन विक्री सुरु केली आहे.
तिरंग्याची प्रतिमा असलेल्या पायपुसणीच्या प्रकरणी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर कंपनीनं पायपुसणीची जाहीरात वेबसाईटवर काढली होती. त्या प्रकरणाला आठवडाही उलटत नाही तोच, आता अमेझोननं गांधींचा फोटो असलेल्या चपला ऑनलाईन विक्रीला ठेवल्या आहेत.
अमेझॉनच्या या कृतीनंतर ट्विटर यूजर्सनी यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक पाऊल उचलले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, तिरंग्याच्या पायपुसणी प्रकरणानंतर अमेझॉन इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि कंट्री मॅनेजर अमित अग्रवाल यांनी सुषमा स्वराज यांना पत्र लिहून तिरंग्याच्या पायपुसणी प्रकरणी खेद व्यक्त केला आहे.
संबिधित बातम्या
तिरंग्याची पायपुसणी, अमेझॉनवर कडक कारवाईचा केद्रांचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement