एक्स्प्लोर

5G Network : 5G नेटवर्कमुळे होणार 'हे' फायदे; 10 महत्त्वाचे मुद्दे येथे पाहा

5G Internet : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण पार पडलं. यासह भारताने टेलिकॉम क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.

5G Internet Launch : आज देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. यासह भारताने टेलिकॉम (Telecom Industry) क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. यामुळे भारतीयांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. भारतात सुरु असलेल्या डिजिटल इंडिया (Digital Inadi) चळवळीलाही या 5G इंटरनेट सेवेमुळे (5G Internet Benefits) फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचं लोकार्पण पार पडलं. यावेळी टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमटचा लिलाव पार पडला. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये 5G नेटवर्कसाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. आज अखेर देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला असून याबाबतच्या महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर टाकूया.

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेला सुरुवात झाली आहे.  1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान IMC कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे.
  3. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5G सेवेचा मोठा फायदा होईल.
  4. 5G चा म्हणजे Fifth Generation असा आहे. ही एक नवीन जागतिक वायरलेस प्रणाली आहे. 5G चा इंटरनेट स्पीड 4G पेक्षा दहा पटीने जास्त असेल.
  5. सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, 2023 पर्यंत देशातील बहुतांश शहरांमध्ये ही सेवा सुरु होईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
  6. 5G इंटरनेट सेवा सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर पसरेल. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.
  7. रिलायन्स इंडस्ट्रिजचे (Reliance Industries Limited)  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओच्या 5G (Reliance Jio 5G Service) इंटरनेट सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ डिसेंबर 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशात 5G सेवा पोहोचवेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे. 
  8. देशात 5G सेवा सुरू झाल्यामुळे देशात डिजिटल क्रांती होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया चळवळीला चालना मिळेल.
  9. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या 5G इंटरनेट लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पनवेल महानगर पालिका विद्यार्थांशी संवाद साधला. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशीही नी संवाद साधला.
  10. तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget