5G Internet : देशात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ; डिजिटल इंडिया चळवळीला गती मिळणार : पंतप्रधान मोदी
5G Internet in India : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेचा (5G Internet Service) शुभारंभ झाला आहे.
5G Internet Service : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेचा (5G Internet Service) शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 5G इंटरनेट सेवेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतामध्ये रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल (Airtel) यासारख्या टेलिकॉम कंपन्यांनी याआधी दिवाळीमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला भारतामधील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे. आता कोणती टेलिकॉम कंपनी कोणत्या दरात 5G इंटरनेट सेवा देते हे पाहावं लागणार आहे.
Prime Minister Narendra Modi launches the #5GServices in the country, at Indian Mobile Congress (IMC) 2022 in Delhi. pic.twitter.com/uJo2ovkrcr
— ANI (@ANI) October 1, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं 5G चं महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, 2014 मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट युजर्स होते, आज ही संख्या 85 कोटी झाली आहे. ग्रामीण भागातून इंटरनेट युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन आणि जुन्या युजर्सना इंटरनेटच्या 5G सेवेचा मोठा फायदा होईल.
5G नेटवर्कचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यका. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- 5G Services Launch : इंटरनेटपासून ते डाऊनलोड स्पीडपर्यंत, 5G नेटवर्क 4G पेक्षा किती पटीने वेगवान? वाचा 5G चे फायदे
- Jio 5G Network : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, 'या' तारखेपर्यंत संपूर्ण देशात Jioचं 5G नेटवर्क