SSC Results : सेम टू सेम! दहावीच्या परीक्षेतही जुळ्या बहिणींना जूळे गुण; बीडच्या आष्टीतील अनुष्का-तनुष्काची सर्वत्र चर्चा
SSC Results : बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहे. 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगलीच चर्चा होत आहे.

SSC Results : राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) नुकाताच 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. या त्यानंतर, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सेलीब्रेशन सुरू झाले असून पास झालेल्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. शिवाय निकालाच्या अनुषंगाने आता अनेक घटना देखील समोर येत आहे. अशाच एका घटनेची चर्चा सध्या बीडच्या आष्टीतून पुढे आली आहे. बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहे. 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगलीच चर्चा होत आहे.
बीडच्या आष्टीतील अनुष्का-तनुष्काची सर्वत्र चर्चा
आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोघ्या जुळ्या बहिणी आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणाच्या बाबतीत अनेक बातम्या ऐकल्या असतील. मात्र जुळ्या बहिणीनी जुळे गुण प्राप्त केल्याने याची चर्चा होतेय. आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या धीरज देशपांडे यांच्या दोन जुळ्या मुलींनी कमालच केली. विशेष म्हणजे दोघींना नृत्याची आवड आहे. त्यामध्ये दोघे हुबेहूब नृत्य करतात. दहावीला सोबत अभ्यास केला, शाळेतही सोबत जायचो. पण वाटलं नव्हतं दोघींना एक सारखेच गुण पडतील. निकाल लागल्यानंतर खूप आनंद झाला. आम्ही दोघी एकमेकींच्या शंका निरसन करायचं, त्यामुळेच चांगले गुण पडले असं अनुष्का हिने सांगितले. तर आई-वडिलांनी आनंद व्यक्त करत दोन्ही गुणी लेकींचे औक्षण करून शाब्बासकी दिली.
68 वर्षाच्या इंदूताईंनी उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा
वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षाच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आज्जीचे सर्वत्र कौतुक होत असून अजिसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या इंदूताई यांना 51 टक्के गुण मिळाले आहे. तर नातू धीरज याला 75 टक्के गुण मिळाले आहे. एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले आणि पासही झालेय. केवळ सातवीपर्यत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आले नाही. पण वयाच्या अडुसष्टव्या वर्षी इंदूताईना प्रथम संस्थेकडून सेकंड चान्स मिळाला आणि त्यांनी दहावीची परीक्षा देत यश मिळविले आहे.
टीका करणार्यांना यशातून दिलं उत्तर, आजी अन् नातू दोघेही एकाच वेळी उत्तीर्ण
जामनी या गावात इंदूताई ह्या बचत गटाच्या कामात सतत पुढाकार घेतात. इंदूताईनी माहेरी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळी लग्न झालं. शिकण्याची इच्छा असतानाही पुढे शिकता आले नाही. परंतु प्रथम या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सेकंड चान्स देत दहावीची परीक्षा तयारी करून घेतली. त्यांना परीक्षेला बसविलं. त्यात इंदूताई यांनी देखील वर्षभर दहावीचे धडे गिरवत परीक्षा दिली. इंदूताई सोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा सुचली म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केलीय.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























