एक्स्प्लोर

नादखुळा... दहावीच्या परीक्षेत नातवासह 65 वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण

मुंबईतील एका कुटुंबात आजी आणि नातवाने सोबतच दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये, दोघांनाही यश मिळाले असून नातवाहसह आजीदेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.

मुंबई : राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर, विद्यार्थ्यांचे सेलीब्रेशन सुरू झाले असून पास झालेल्यांचे अभिनंदन केले जात आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे. तर, 35 टक्के मिळवलेल्यांचाही सत्कार सन्मान झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा रात्र शाळांमधून अनेकांनी आपली दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अहिल्यानगरमध्ये एका वडापाव विक्रेत्या महिलेनं जिद्द, चिकाटीने 10 वीची परीक्षा पास केली. तर, तेथील एका माजी सैनिकाने 10 वी बोर्ड परीक्षा पास होऊन मुलासह आनंद साजरा केला. कारण, मुलगा आणि वडिल एकाचवेळी दहावी पास झाले आहेत. दुसरीकडे मुंबईत (Mumbai) नातवासह आजीनेही दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याने दौघांचेही कौतुक होत आहे. 

मुंबईतील एका कुटुंबात आजी आणि नातवाने सोबतच दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये, दोघांनाही यश मिळाले असून नातवाहसह आजीदेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. 65 वर्षीय प्रभादेवी यांनी यंदाच दहावीची बोर्ड परीक्षा दिली असून त्यांना 52 टक्के गुण मिळाले आहेत. तर, त्यांचा नातू सोहम हा 82 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे, त्यांच्या कुटुंबीयांत दहावीच्या निकालाचा डबल आनंद पाहायला मिळत आहे. 10 वी पास झाल्याने मला मोठा आनंद झाला असून माझा नातू देखील चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे हा आनंद द्गिगुणीत झाला आहे. मी मराठी माध्यमातून पास झाले असून माझा मुलगा इंग्रजी मीडियमधून पास झाला आहे, अशी माहिती प्रभादेवी यांनी दिली. तसेच, मी परीक्षेला जात होते तेव्हा अनेकजण माझी आपुलकीने विचारपूस करत व आनंद व्यक्त करत होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. दरम्यान, राज्यात दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल (SSC Results) जाहीर झाला. त्यामध्ये, कोकण विभागाने 98.8 टक्के निकाल घेत राज्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.10 लागला आहे.

राज्यातील 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के

राज्यात 12 वीनंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 % लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के असून नागपूर विभागात सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. लातूर (Latur) पॅटर्नचा यंदाही म्हणावा तेवढा निकाल दिसला नाही. कारण, राज्यातील 9 विभागांपैकी लातूर विभागाचा निकाल यंदा शेवटून दुसऱ्या क्रमांवर असून 92.77 टक्के एवढा आहे. मात्र, लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवल्याने पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची चर्चा होताना दिसून येईल. राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी (Student) 100 टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचं दिसून येतं. दरम्यान, लातूर विभागात धाराशिव जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आह.  

हेही वाचा

मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Maritime Week 2025: 'महाराष्ट्र सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करेल', Fadnavis यांचा विश्वास; ₹55,969 कोटींचे करार
Green Energy: 'सोलर पॅनलपेक्षा तिप्पट वीज निर्माण करतो', Guinness रेकॉर्ड धारक मुस्तफा अकलवाडलांचा दावा
Extortion Racket: 'तुमच्या मुलाच्या जीवाला धोका', Mira Road मध्ये School Bus मालकाकडूनच 4 लाखांची खंडणी
Voter List Fraud: 'निवडणुकीपुरते येतात, पैसे घेतात आणि निघून जातात', MNS-ठाकरे गटाचा गंभीर आरोप
India Maritime Week 2025: 'महाराष्ट्र सागरी व्यापारात देशाचं नेतृत्व करेल', Fadnavis यांचा विश्वास; ₹55,969 कोटींचे करार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Share Market : शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, 28 ऑक्टोबरला बाजारात कसं चित्र असणार?
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
Embed widget