एक्स्प्लोर

Barshi Fire: सोलापूर- पांगरी फटाका कारखान्याला कोणताही परवाना नव्हता, सूत्रांची माहिती

सोलापूर- पांगरी फटाका कारखाना करण्यासाठी  2007 साली युसूफ मणियार यांनी कारखाना सुरु करण्यासाठी परवानगी होती. कोणत्याही निकषाचे पालन न करता पत्राच्या शेडमध्ये हा गोडाऊन आणि कारखाना त्यांनी सुरु केला होता.  

Solapur Barshi Fire : सोलापूर- पांगरी फटाका आग प्रकरणात  (Solapur Barshi Pangri Fire News)  धक्कादायक माहिती समोर आली आहे.   सोलापूर- फटाका कारखान्यात ज्या ठिकाणी स्फोट झाला  कारखान्याला कोणताही परवाना नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  परवानगी दिलेली जागा सोडून दुसरीकडे कारखाना सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. 

सोलापूर- पांगरी फटाका कारखाना करण्यासाठी  2007 साली युसूफ मणियार यांनी कारखाना सुरु करण्यासाठी परवानगी होती. मात्र तो परवाना ज्या ठिकाणी दिला होता त्याला सोडून दुसरीकडे विनापरवाना त्यांनी दुसरा कारखाना सुरु केला होता. कोणत्याही निकषाचे पालन न करता पत्राच्या शेडमध्ये हा गोडाऊन आणि कारखाना त्यांनी सुरु केला होता.  

फटाक्यासाठी 15 किलोपर्यंतच्या परवाना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिला जातो. मात्र त्यापेक्षा जास्त जर दारू साठा असल्यास त्याची परवानगी ही PESO अर्थात  The Petroleum and Explosives Safety Organization तर्फे दिली जाते. मात्र स्फोट झालेल्या ठिकाणी नियमापेक्षा जास्त दारूसाठा असण्याची शक्यता आहे. हे तपासण्यासाठी प्रशासनतर्फे Explosives एक्सपर्टची एक टीम देखील बोलवण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.  मात्र इतके वर्ष जर हा कारखाना सुरु होता तर त्याची माहिती प्रशासनला कशी कळली नाही हा प्रश्न  या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

दरम्यान काल ज्या ठिकाणी स्फ़ोट झाले त्याचे परवाना तपासण्याचे काम प्रशासनमार्फत सुरू आहे. त्या ठिकाणी दोन आस्थापना आहेत ही वस्तुस्थिती आहे. एक कारखाना आणि एक गोडाऊन होते अशी माहिती आहे. मात्र गोडाऊनमध्ये काम सुरु होतं का? आग लागण्याचे नेमके कारण काय हे पोलीस तपासात समोर येईल. पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असल्याची माहिती  सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये (Solapur Barshi Pangri Fire News) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे.  बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.  जवळपास नऊ जण जखमी असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.  मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनाकडून घोषित करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget