एक्स्प्लोर

रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा घ्या, माळशिरस तालुका महायुतीच्या वतीनं ठराव, राम सातपुतेही उपस्थित

रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस Malshiras) तालुका महायुतीच्या  वतीने करण्यात आला आहे.

Malshiras Bjp Meeting News : रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस Malshiras) तालुका महायुतीच्या  वतीने करण्यात आला आहे. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. यावेळी आमदार राम सातपुते  (Ram Satpute) उपस्थित होते. 

माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने ठराव केला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा घ्यावा. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थेची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मोहीते पाटील यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या संस्थांची उच्चस्तरीय समिती कडुन चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते व महायुतीचे मधील समाविष्ट पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोण आहेत रणजितसिंह मोहित पाटील?

रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुत्र आहेत. ते सध्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. एक अभ्यासू, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंर मोहिते पाटील यांना विधानपरिषदेरवर पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, यावेळी माढा लोलकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना 1 लाख मताहून अधिक लीड माळशिरस मतदारसंघातून दिलं होतं. निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता. 

लोकसभा निवडणुतीच्या काळात धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेची निवडणूक लढवण्या इच्छुक होते. त्यांनी भाजपकडे तशी इच्छा देखील व्यक्त केली होती. मात्र, भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलत, पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत भाजपला पराभवचा धक्का बसला. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रावदी काँग्रेसकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावरी देण्यात आली होती. मोहिते पाटलांनी निंबाळकरांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील हे कुठेही धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करताना दिसले नाहीत. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करुन, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माळशिरस महायुतीच्या वतीनं करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांची मुसंडी, निंबाळकरांना दणका, कोणत्या तालुक्यात किती मताधिक्य? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Embed widget