शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांची मुसंडी, निंबाळकरांना दणका, कोणत्या तालुक्यात किती मताधिक्य?
मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांच्या मतदारसंघात मोहिते पाटलांनी मुंसडी मारली आहे.
Madha loksabha Election Result : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha loksabha Election) मतदारांनी भाकरी फिरवली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairsheel mohite patil) हे विजयी झाले आहे. त्यांनी मोठ्या फरकाने भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांचा पराभव केला आहे. हा भाजपसाठी मोठा हादरा आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात सहा तालुके येतात. या सहाही तालुक्यात महायुतीचं वर्चस्व आहे. तरीदेखील मोहिते पाटील निवडूण आले. दरम्यान, मोहिते पाटील यांच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांच्या मतदारसंघात मोहिते पाटलांनी मुंसडी मारली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. 1 लाख 20 हजाराहून अधिक मताधिक्य मोहिते पाटील यांनी घेतलं आहे. हा भाजपसाठी मोठी धक्का आहे. कारण या मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मतदारसंघात सभांचा आणि बैठकांचा धडाका लावला होता. मात्र, सर्व नेते एकिकीडे आणि जनता एका बाजूला झाल्याचं चित्र माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळालं.
शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांना आघाडी
माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील तीन तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे. तर रणजितसिंह निंबाळकरांनी तीन तालुक्यात मताधिक्य मिळालं आहे. मात्र, निंबाळकरांना मिळालेलं मताधिक्य अल्प प्रमाणात आहे. विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांना आघाडी मिळाली आहे. माढा आणि करमाळा तालुक्यात मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य मिळालं आहे. माढ्यात मोहिते पाटलांना 50000 हून अधिकचा लीड मोहिते पाटलांनी मिळाला आहे. तर करमाळा मतदारसंघातून 41000 हून अधिकचा लीड त्यांना मिळाला आहे. जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघाच कोण आघाडीवर कोण पिछाडीवर.
कोणत्या तालुक्यात कोणाला किती मताधिक्य?
मतदारसंघ - धैर्यशील मोहिते पाटील - रणजितसिंह निंबाळकर - मताधिक्य
माढा - 122570 70055 52515
करमाळा - 94469 55958 41511
माळशिरस - 134279 64145 70134
माण - 86059 109414 23355
फलटण - 93633 110561 16928
सांगोला - 84556 89038 4482
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
माढा - बबनदादा शिंदे - राष्ट्रादी काँग्रेस अजित पवार गट
करमाळा - संजयमामा शिंदे - राष्ट्रादी काँग्रेस अजित पवार गट
सांगोला - शहाजीबापू पाटील - शिवसेना शिंदे गट
माळशिरस - राम सातपुते - भाजप
माण खटाव - जयकुमार गोरे - भाजप
फलटण - दिपक चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट