एक्स्प्लोर

Agriculture News : शेतीला बांध नसणारं गाव, महाराष्ट्रातील अनोख्या गावाची सर्वत्र चर्चा; काय आहे शेकडो वर्षाची परंपरा

Agriculture News : महाराष्ट्रात (Maharashtra) एक असे गाव आहे की जिथे शेतीला बांधच नाही. तिथे शेतील बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे.

Mangalwedha News : राज्यात सर्वात जास्त तंटे हे शेतीच्या बांधावरुन होत असतात. बांधाच्या वादावरून अगदी सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या वाचनात किंवा पाहण्यात येतात. महसूल, पोलीस आणि न्यायालयात सर्वात जास्त वाद देखील बांधावरुन झाल्याचे दिसते. मात्र, महाराष्ट्रात (Maharashtra) एक असे गाव आहे की जिथे शेतीला बांधच नाही.  शेतील बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalwedha) शिवारात आजही जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाही. 

संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव 

एका बाजूला राज्यात पिढ्या वाढतील तशी  शेतीच्या तुकड्यांची संख्या वाढत चालली आहे.  हे होत असताना बांधाचे वाद ही महाराष्ट्रासमोरची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. मंगळवेढ्यात आजही शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. इथे शेतीच्या शिवेवरून किंवा बांधावरून कधी वादच होत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे शहर संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि संतपरंपरा असणारे शहर आहे. मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर कधीच बांध घालण्याची परंपरा नाही. हे विशेष आहे. एखाद्या रोडवर सलग 15 किलोमीटरपर्यंत पाहत गेला तरी तुम्हाला बांध नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही. 

Agriculture News : शेतीला बांध नसणारं गाव, महाराष्ट्रातील अनोख्या गावाची सर्वत्र चर्चा; काय आहे शेकडो वर्षाची परंपरा

मंगळवेढ्याची ज्वारी सातासमुद्रापार 

मंगळवेढ्याची ओळख ज्वारीचे कोठार म्हणून केली जाते. येथील मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारचे GI मानांकन देऊन तिला सातासमुद्रापार पोहोचवले आहे. अगदी 200 मीटरपर्यंत धर नसलेली काळ्याशार जमिनीतून ही कसदार ज्वारी पिकते. त्यामुळेच या शिवारातील गुळभेंडी हुरड्याला देखील काही न्यारीच चव असते. येथील काळ्या कसदार जमिनीतून केवळ एखाद्या पावसावर येणारी मोत्यासारखी पांढरी शुभ्र ज्वारी, हरभरा, करडई या पिकात औषधी गुणधर्म असल्याने याला फार मोठी मागणी असते. येथील शेतकऱ्यांनी कधीच ज्वारीचे बियाणे बाजारातून खरेदी केल्याचे ऐकिवात नाही. पिढ्यानपिढ्या शेतात आलेल्या ज्वारीतून दरवर्षी पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी थोडी ज्वारी ठेवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळेच की काय या परिसरात आजारी पाडण्याचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असल्याने या भागात आयसीयू सेंटर देखील नसल्याची माहिती मंगळवेढ्याचे शेतकरी अंकुश पडवळे यांनी दिली. 

Agriculture News : शेतीला बांध नसणारं गाव, महाराष्ट्रातील अनोख्या गावाची सर्वत्र चर्चा; काय आहे शेकडो वर्षाची परंपरा

जमिनीला धर नसल्यानं शेतात टाकलेलं बांध टीकत नाही

मंगळवेढ्यातील जमिनीला धरच नसल्याने या शेतीत बांध केलेले टीकत नाहीत. एखाद्या पावसात केलेले बांध मोडून जातात. हा पूर्वापार चालत आलेला अनुभव असल्याने या भागातील शेतकरी कधी बांधाच घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मग आपली जमीन केवळ नजरेवर ओळखायची कशी याचे टेक्निक देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. तसे बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात आणि यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या मालकीची जमीन लक्षात ठेवत असतो. याला शेजारी शेतकरी देखील कधी आक्षेप घेत नाही किंवा वाद करीत नाही.

हद्दीवरून कधी वादही होत नाहीत

जमीन मालकासोबत बैलाला देखील मालकाच्या जमिनीच्या खुणा माहित असल्याने तो त्याच पद्धतीने नांगरट करीत असल्याची माहिती शेतकरी भारत दत्तू आणि गुरुलिंग पावले यांनी दिली.  तसेच आमच्या 10 पिढ्या शेजारी असून जमिनीचे तुकडे पडत गेले तरी आमच्यात कधी हद्दीवरून आजवर वाद झाला नसल्याचे भारत दत्तू सांगतात. आमच्यात जरी वाटण्या झाल्या तरी आम्ही कासऱ्याने किंवा पावले टाकून एकदा जमिनीची वाटणी करून देतो ती कायमची असते असे दत्तू सांगतात. तरुण पिढीला देखील या जमीन वाटण्याची पद्धत मान्य असते आणि त्यामुळं आमच्या नवीन पिढीत देखील कधी बांधावरून वादावादी होत नसल्याचे दामाजी सरगर यांनी सांगितले.  

सगळी शेती पावसावर अवलंबून 

जमिनीत धर नसल्याने येथील शेतकरी कधीच या शेतात वस्ती करून राहू शकत नाहीत. तसे येणारे पीक फक्त पावसावर अवलंबून असल्यानं आपल्या शेतावर येण्यासाठी सुद्धा घरातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे दामाजी कारखान्याचे संचालक मुरलीधर दत्तू यांनी सांगितले. काळ्या मातीमुळं इथे कोणत्याही शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी सकाळी रानात येऊन संध्याकाळी परत जातो. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या या समजूतदारपणामुळं इथे कोणतेच वाद कधी होत नसल्याचे भीमराव भगरे सांगतात .

निसर्गाने दिलेल्या या परिस्थितीवर येथील हजारो शेतकऱ्यांनी समजूतदारपणे मात करीत महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला आहे. बांधावरून जीवघेण्यापर्यंत येणाऱ्या महाराष्ट्रातील इतर सुपीक बागायती गावांनी मंगळवेढ्याचा समजूतदारपणाचा आदर्श घेतल्यास यापुढे शेतीची शिव आणि बांधावरून होणारे वाद शमणार नसले तरी नक्की कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी फक्त स्वार्थीपणाला मुरड घालून थोडा समंजसपणा धरल्यास खऱ्या अर्थाने तंटामुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : सातपुड्याच्या कुशीत फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा, मिळतोय लाखोंचा नफा; वाचा नंदूरबारच्या धिरसिंगची यशोगाथा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget