Maharashtra Solapur News : राजकारणात चकवा बसला की, थेट पाच वर्ष घरी बसावं लागतं; सांगोल्यातील कार्यक्रमात शहाजीबापूंची फटकेबाजी
Maharashtra Solapur News : आपल्या गावरान ढंगातील वक्तुत्वामुळं राज्यभर फेमस असलेल्या शहाजीबापूंना काल (रविवारी) त्यांच्याच सांगोल्यात तरुणाईनं डोक्यावर घेतलं.
Maharashtra Solapur News : काय झाडी... काय डोंगार... काय हाटील या डायलॉगनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) गाजवला. एकीकडे शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळी आणि दुसरीकडे हा डायलॉग चर्चेचा विषय ठरला. आणि याच डायलॉगमुळे प्रकाशझोतात आले ते म्हणजे, सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil). मग काय ज्या कार्यक्रमात जाणार तिथे डॉयलॉग ऐकवून दाखवायच्या फर्मायशी सुरु झाल्या. अगदी लहान-थोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या डायलॉगनं भूरळ घातली. पण शहाजीबापूंनी आजा थेट स्वतःचा मतदारसंघ असलेल्या सांगोल्यातच हव्वा केली आहे.
आपल्या गावरान ढंगातील वक्तुत्वामुळं राज्यभर फेमस असलेल्या शहाजीबापूंना काल (रविवारी) त्यांच्याच सांगोल्यात (Sangola Vidhan Sabha Constituency) तरुणाईनं डोक्यावर घेतलं. निमित्त होतं राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाचं. सांगोला विद्या मंदिर येथे या सामन्याचं आयोजन केलं होतं. यासाठी राज्यभरातील जिल्ह्याजिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना शहाजीबापूंनी सगळ्या जिल्ह्यांची नावं एका दमात घेतली, तसेच, इथे आता अवघा महाराष्ट्र जमल्याचं सांगितलं. बापूंच्या या वाक्यानंतर जमलेल्या तरुणाईनं टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. कार्यक्रमात एकच जल्लोष झाला.
तुमच्याकडे बघितल्यावर वाटतं देवानं आपल्याला लवकरच म्हातारं केलं, असं सांगत शहाजीबापू पाटलांनी तरुणाईशी संवाद साधत फटकेबाजीला सुरुवात केली. "तुमचं आणि आमचं सेम असतं, असं सांगताना तुम्हाला खेळात चकवा नाही बसला तर गोल होतो आणि आम्हाला चकवा नाही बसला तर आमच्या अंगावर गुलाल पडतो. मात्र तुम्हाला चकवा बसला, तरी पुढच्या संधीत तुम्हाला यश मिळू शकतं. पण आम्हाला जर चकवा बसला तर थेट पाच वर्ष घरी बसावं लागतं.", अशी मिश्किल टिप्पणी केली.
दरम्यान, पुढे बोलताना शहाजीबापूंनी त्यांच्या कॉलेज जीवनातील किस्से सांगत समारोपाला सुरुवात केली. त्यानंतर पुढे तरुणाईनं त्यांना त्यांचा गाजलेला डायलॉग म्हणण्याचा आग्रह केला. तरुणाईचा आग्रह वाढत गेल्यावर मग शहाजीबापुंनी तोच डायलॉग, त्याच ढंगात म्हणून भाषणाचा समारोप केला. शहाजीबापूंनी डायलॉग बोलण्यास सुरुवात करताच, तरुणाईनंही शहाजीबापूंना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. एकंदरीत शहाजीबापू यांची क्रेज महाराष्ट्रातील तरुणाईत किती वाढत चालली आहे. याचा प्रत्यय आज पुन्हा त्यांच्या सांगोल्यात पाहायला मिळाला. दरम्यान, कालपासून या सामान्यांना सुरुवात झाली असून पाचव्या दिवशी जिंकलेला संघ राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bacchu Kadu on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सात्विक अन् प्रामाणिक माणूस; मात्र ते... : बच्चू कडू