एक्स्प्लोर

गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या सोलापूरच्या डीजे ऑपरेटरला मारहाण, अज्ञात लोकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Solapur News: प्रमोदच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत साधारण आहे. घरात कमावणारा एकमेव तरुण होता. त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोलापूर: गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) डीजे घेऊन कर्नाटकातील इंडी येथे गेलेल्या ऑपरेटरचा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Solapur Civil Hospital)  उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमोद अंबादास शेराल असे मृत्यू झालेल्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मात्र अज्ञात लोकांनी केलेल्या मारहाणीमुळे प्रमोदचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. 

प्रमोद शेराल हा अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. मागील काही वर्षांपासून तो डीजे ऑपरेटर म्हणून काम करतो. गणेशोत्सवानिमित्त त्याला विजापूर जिल्ह्यातील इंडी येथे डीजे वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्यासाठी विजापूरला गेला होता. मात्र तीन दिवसांपूर्वी रात्री त्याला अज्ञात लोकांनी घरासमोर जखमी अवस्थेत आणून सोडले. जखमी प्रमोद यांस कुटुंबियांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रमोद याला कशासाठी त्याला इतकी बेदम मारहाण करण्यात आली? त्याला मारहाण कोणी केली? या सगळ्यांची उत्तरं सध्या अनुत्तरीत आहेत. या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रमोदच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केलाय.

घरात कमावणारा एकमेव तरुण

दरम्यान कर्नाटक पोलिस या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णलयात आले होते. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांनीकडून जाणून घेतली. मात्र माध्यमांना कोणतीही माहिती देण्यास नकार दिलाय. प्रमोदच्या मृत्यूची बातमी कळताच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच्या नातेवाईक आणि मित्रमंडळीची मोठी गर्दी झाली होती. प्रमोदच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत साधारण आहे. घरात कमावणारा एकमेव तरुण होता. त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची सविस्तर चौकशी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी ही करावी अशी प्रतिक्रिया मृत प्रमोदच्या नातेवाईकाकडून करण्यात आली.

पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

हिंजवडी येथील एका 23 वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. योगेश अभिमन्यू साखरे असे मृताचे नाव असून तो हिंजवडी येथील रहिवासी आहे. सागरला हृदयविकाराचा त्रास होता आणि डॉक्टरांनी त्याला उपचाराचा सल्ला दिला होता, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तो हिंजवडीजवळ मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने औषध खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये धाव घेतली तिथेच तो कोसळला.

हे ही वाचा :

 सांगलीत डॉल्बीच्या दणदणाटात आणखी एक हकनाक बळी? विसर्जन मिरवणूक मार्गावर व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget