Ravindra Dhangekar on Pune Porsche Accident: पुणे : काँग्रेसचे (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) डीनची भेट घेतली. दबावाला बळी पडू नका अशी सूचना त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली. तसंच मंत्र्यांच्या जवळचे असल्याने डॉक्टर तावरेंना पद मिळालं, असा आरोपही त्यांनी केला.काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर बोलताना म्हणाले की, 'ससून रुग्णालयातील डीनची आज मी भेट घेतलीय. याप्रकरणी तुमच्यावर कुणाचाही दबाव आला, तर त्याला बळी पडू नका. हा संपूर्ण समाजाचा विषय आहे, हा देशातील नागरिकाचा विषय आहे. लवकरात लवकर तुम्ही चौकशी पूर्ण करून अहवाल द्या. चुकीच्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मी विनंती केली.''पोलिसांकडून लाखो रुपये जप्त केले आहेत. डॉ. तावरे विरोधात याआधी पण आक्षेप होते. तुमच्यावर दबाव आला तरी, तुम्ही दबावाला बळी पडू नका, असं डीन यांना सांगितलं आहे. डॉ. तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्यानं पद मिळालं, रात्री दोन वाजता डॉ. तावरे ब्लड रिपोर्ट बदलतो. हे किती भयानक आहे. रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाली.', असं धंगेकर म्हणाले आहेत. तसेच, माझ्यावर स्टंट करत असल्याचे आरोप केले जातात, असंही त्यांनी सांगितलं.