नवी दिल्ली : आपल्यावर सातत्याने हुकूमशहा असल्याचा आरोप केला जातोय, अनेकदा अपमानही केला जातो, पण जगातला कोणता हुकूमशहा इतरांच्या शिव्या खातो? शिव्या खाणारा हुकूमशहा कुठे असतो का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला. 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत देताना नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं. येत्या काळात देशाला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करणार बनवणार असून त्याचा रोडमॅप तयार असल्याचंही मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक मला हुकूमशहा म्हणतात आणि शिव्या देतात. हुकूमशहाचे इतके अवमूल्यन झाले आहे कुठे होते का? ही व्यक्ती हुकूमशहा असल्याच्या शिव्या ऐकते आणि तरीही काही बोलत नाही. लहानपणापासून मला अपमान सहन करण्याची सवय आहे. मी नेहमी म्हणतो की विरोधक नामदार आहेत आणि मी कामदार आहे.