एक्स्प्लोर

Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींचा राजीनामा, अपयश कोणाचे? व्यवस्थेचे की काही नवं करू पाहणाऱ्यांचे

ग्लोबल टीचर रणजीत डिसले यांच्या समर्थनार्थ  शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पत्र  महाराष्ट्राला अंतर्मुख करायला लावणारं आहे.

सोलापूर :  जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनामा दिला आहे. 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली हा या निमित्ताने उपस्थित झालेला प्रश्न आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. 

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सोलापूरच्या परितेवाडीतल्या शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर अवार्ड जाहीर झाला. ग्लोबल टीचर रणजीत डिसले यांच्या समर्थनार्थ  शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पत्र  महाराष्ट्राला अंतर्मुख करायला लावणारं आहे. रणजित डिसलेंना होत असलेल्या त्रासाची पहिली बातमी एबीपी माझावर प्रसारीत झाली. डिसले यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्कांनतर त्यांची होत असलेली घुसमट बाहेर आली.  डिसले यांनी प्रतिनियुक्तीवर असताना काम केले नाही असे सांगून डिसले यांच्याकडून 17 लाख रूपये प्रशासन वसूल करणार आहे.  ग्लोबल पातळीवर भारताची मान उंचावणाऱ्या या शिक्षकाची लोकल कुंचबना मात्र अद्यापही सुरुच आहे. मात्र असे असली तरी शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी रणजित डिसलेंना पाठिंबा देताना एक पोष्ट लिहिली आहे.

प्रिय रणजित डिसले,

तू राजीनामा दिल्याची बातमी काल पेपरात वाचली .
खूप आनंद झाला.
 बरे झाले तू आमच्या व्यवस्थेतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतलास..
अन्यथा तुला सळो की पळो आम्ही करणारच होतो....
आणि काय करायचे बाकी ठेवले....?
एका जागतिक दर्जाच्या शिक्षकाला राज्यातील सर्वात मोठा गुन्हेगार शिक्षक म्हणून बदनाम केले....
आणखी खूप काही करू शकतो
आमच्या या व्यवस्थेत तुझ्यासारखे लोक आम्हाला नकोच आहेत...
 इतके दिवस तुला आम्ही व्यवस्था म्हणून सांभाळले.
 हेच तू तुझे नशीब समज. 
 राज्यात लाखो कर्मचारी काम करतात.
इतर लोक जसे आपली नोकरी भली की आपण भले असे जगतात अशा स्थितीत आपण कोणीतरी शहाणे आहोत असे समजून थेट जागतिक पुरस्कार मिळवला 
आणि त्या धक्क्यातून आम्ही सावरतो ते कमी की काय ?अमेरिकेतील फुल ब्राईट शिष्यवृत्ती मिळाली
 ...हे जरा अतीच झालं..

 ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली. यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. त्यामुळे डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी डिसले यांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले गेले आणि शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी गंभीर आरोप देखील केले.

 शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी केलेल्या या आरोपांमुळे  व्यथित झालेले डिसले गुरुजी सरकारी शिक्षकाची नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत होते, तशी भावना देखील त्यांनी एबीपी माझासमोर बोलून दाखवल होती. इतकच काय तर शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला, पैशाची मागणी केली असे आरोप देखील केले.  तत्कालीन शिक्षणमंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे डिसले यांची रजा मंजूर झाली. डिसले यांचा  फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र आता पुन्हा डिसले यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहेच.

रणजितसिंह डिसले यांनी अद्याप तरी आपल्या राजीनाम्यासंदर्भात माध्यमांसमोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिक्षण क्षेत्रातील तज्ञ या सगळ्या घटनांमुळे चिंता व्यक्त करत आहेत. 

 जिल्हा परिषद शाळांमधील घटत्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरुन शिक्षण व्यवस्थेवर नेहमीच प्रश्न उपस्थित होत राहिलेत.  मात्र याच शिक्षण व्यवस्थेत राहून जर एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आपले शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले. मात्र केवळ तांत्रिक कारणांमुळे अशा शिक्षकाला राजीनामा देण्याची वेळ येते. यावर समाज म्हणून सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. 
 
मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व

व्हिडीओ

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
Embed widget