Sangli Crime : दोन वर्षाच्या लेकीचा घास लागून मृत्यू, विरह सहन न झाल्याने आई वडिलांची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या
सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. करन नाना हेगडे (वय 28) व शीतल करन हेगडे (वय 22) अशी मृतांची नावे आहेत.
Sangli Crime : पोटच्या दोन वर्षीय चिमुकलीचा घशामध्ये घास अडकून झालेला अचानक मृत्यू आणि मुलीच्या मृत्यूचा सहन न होणारा विरह या नैराश्यातून मुलीच्या आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत ह्रदय पिळवणूक टाकणारी ही घटना घडली. एकाच दोरीने गळफास घेऊन पती-पत्नीने आपली जीवनयात्रा संपवली. करन नाना हेगडे (वय 28) व शीतल करन हेगडे (वय 22) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या हेगडे दाम्पत्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर लिहिला आहे.
करण नाना हेगडे आणि त्यांची पत्नी शितल या दोघांनी राजेवाडी गावातील काळामळा येथे असलेल्या कानिफनाथ मंदिराच्या परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृत करण हा राजेवाडी ग्रामपंचायत सदस्या विमल हेगडे यांचा चिरंजीव आहे. या दांपत्याच्या दोन वर्षाच्या मुलीचा चार दिवसापुर्वी मृत्यू झाला होता. जेवण करीत असताना घास गळ्यात अडकल्याने या मुलीचा तडफडून मृत्यू झाल्याने माता पिता अत्यंत दु:खी झाले होते. या दु:खातून त्यांना सावरण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, गुरूवारी दुपारी कानिफनाथ मंदिर परिसरातील झाडाला एकाच दोरीने गळफास घेउन आत्महत्या केली.
हा प्रकार समजताच आटपाडी पोलीसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. यावेळी मृत करनजवळ एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये बाळा आम्ही तुझ्याकडे येत आहे. तुझा मृत्यू आम्हाला असह्य होत असल्याने आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असा मजकूर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या