एक्स्प्लोर

Sangli News : मिरजेत अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, महिला 25 टक्के भाजली

Sangli News : अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 25 टक्के भाजली असून तिच्यावर मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमध्ये (Miraj) रस्त्यावरील अतिक्रमणाचा वाद चिघळला आहे. अतिक्रमण (Encroachment) हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेने आत्मदहनाचा (Self-Immolation) प्रयत्न केला. या घटनेत महिला 25 टक्के भाजली असून तिच्यावर मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सांगली जिल्ह्यातील मिरजेतील खोतनगर इथे एका कुटुंबाने रस्त्यावर अतिक्रमण केले होते. हे अतिक्रण काढण्यासाठी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे तक्रार केली होती. अतिक्रमण न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार महापालिकेचे पथक बुधवारी (31 मे) दुपारी अतिक्रण काढण्यासाठी गेले होते. यावेळी सुरेश वाघमारे याने महापालिकेच्या महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. तर त्यांची आई सुमन वाघमारे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन पेटवून घेतले. यावेळी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी तातडीने महिलेला लागलेली आग आटोक्यात आणली. परंतु आगीमध्ये महिला सुमारे 25 टक्के भाजली आहे. महिलेवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलं नसून ती आमची जागा असल्याचा दावा वाघमारे कुटुंबाने केला आहे. तर अतिक्रमण काढण्यासाठी गेल्यानंतर आत्मदहनाचा प्रयत्न करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.

प्रांताधिकार्‍याच्या अतिक्रमणामुळे दाम्पत्यावर इच्छा मरण मागण्याची वेळ

तर सांगलीतील एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छा मरणाची परवानगीची मागणी केली आहे तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातल्या त्यांच्या मिळकतीच्या जागेवर प्रांताधिकारीने अतिक्रमण केल्याचा आरोप करत पाटील दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलेलं आहे. सांगली शहरातल्या दक्षिण शिवाजीनगर इथल्या जुन्या माळी चित्र मंदिराच्या मागील बाजू सुनील पाटील यांनी 2006 मध्ये दोन गुंठे जागा खरेदी केली, त्याची रीतसर नोंद देखील केली. त्यांच्याकडे असणाऱ्या उपलब्ध कागदपत्रांच्या अनुसार त्यांच्या आणि जुन्या मालकाच्या मध्ये 2 हजार 100 स्क्वेअर फुट जागेची खरेदी झाली. यानंतर पाटील यांच्या असणाऱ्या भूखंडावर पूर्वीच्या बाजूने सुमारे 300 स्क्वेअर फूट अतिक्रमण झाले आहे. त्यांच्या जागे शेजारी असणाऱ्या गजानन गुरव यांनी हे अतिक्रमण केल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. गजानन गुरव हे पंढरपूर या ठिकाणी सध्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप देखील केला आहे. याबाबत पाटील यांनी अगदी जागेशी संबंधित असणाऱ्या विविध विभागांमध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. याप्रकरणी सुनील पाटील यांनी जागेचे मूळ मालक माळी यांच्यासमवेत गुरव यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. गुरव यांनी आपल्या जागेवर आता बांधकाम केलं आहे, याला महापालिकेकडून बांधकामाची परवानगी देखील मिळाली आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्यामुळे हतबल झालेल्या पाटील दाम्पत्याने शेवटचा पर्याय म्हणून इच्छा मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. सुनील पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे इच्छा मरण अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या पत्नी सारिका पाटील यांनी थेट महापालिकेच्या कार्यालयात गाठून महापौरांच्या दालनात स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Manoj Jarange : एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget