एक्स्प्लोर

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंकडून PM मोदींवर स्तुतीसुमने; गांधी-नेहरू यांच्या विचारावर टीका करत म्हणाले, 'मोदी हे देव माणूस...'

Sambhaji Bhide: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत. त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे, असं म्हणत संभाजी भिडेंनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Sambhaji Bhide: वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल (गुरूवारी) सांगलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. तर गांधी-नेहरुंच्या विचारावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. त्यांनी 370 कलम रद्द केले, आता पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असं म्हणत त्यांनी गांधी नेहरुंच्या विचाराने देशाचा नरक झाला आहे, म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
    
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव माणूस आहेत. मोदींच्यासारखे कणखर पंतप्रधान देशाला लाभले आहेत. त्यांच्यामूळे काश्मिरमधील 370 कलम रद्द झाले आहे. आता ते पाकव्याप्त काश्मीर परत घेतील अशी आशा बाळगूया असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार सोडून आपण गांधी - नेहरुंचे विचार आत्मसात केल्याने देशाचा नरक झाला आहे.

या नरकातून बाहेर पडण्याची वाट म्हणजे छत्रपती  शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजीराजे यांचे विचार आहेत. हे विचारच देशाला तारु शकतील. भगवा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज झाला पाहिजे. या देशाला गांधी बाधा झाली आहे. ही बाधा फक्त छत्रपतींचे विचारच दूर करतील असेही भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपतींनी अफझल खानला मारले नसते तर आज देशात एक मंदिर दिसले नसते. शिवाजी महाराजांना छत्रपती, राष्ट्रसंत यापेक्षा भगवान श्री शिवछत्रपती पदवी द्यायला हवी होती असेही भिडे म्हणालेत.

संभाजी भिडेकडून PM मोदींवर स्तुतीसुमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी देवमाणूस आहेत, त्यांच्या मातोश्रींचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यांनी 370 कलम रद्द केलं. आता पाक व्याप्त काश्मीर परत घेतील, असं म्हणत त्यांनी मोदींवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nasim Khan on BJP | मुस्लीम समाजाला धमक्या देणाऱ्या भाजपा नेत्यांवर कारवाई कधी करणार? -नसीम खानLaxman Hake On Darsa Melava| मी येतोय तुम्ही पण या...हाकेंचे कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यासाठी आवाहनABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 झM 11 September 2024Job Majha : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; कोणत्या पदांवर भरती? एकूण किती जागा रिक्त? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
Embed widget