सांगलीतील शाळेत हॅन्ड ग्रेनेड सापडला, बॉम्बशोधक पथकाने घेतला ताब्यात
Sangli: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर जवळील कुडनूर या गावी मराठी मुलांची शाळेमध्ये हॅन्ड ग्रेनेड सापडला आहे.
Sangli: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शाळेत हॅन्ड ग्रेनेड सापडलं आहे. हॅन्ड ग्रेनेड बॉम्बशोधक पथकाच्या पाण्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात हॅन्ड ग्रेनेट सापडल्याने गावात चिंतेचं वातावरण आहे. हा हॅन्ड ग्रेनेड येथे आला कसा, याबाबत आता पोलिसांसह गावकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर जवळील कुडनूर या गावात हा प्रकार घडला आहे. येथील मराठी शाळेत मुलं बॉल खेळत असताना खिडकीतून आत गेल्याने ते चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले होते. त्यावेळी त्यांना हा हॅन्ड ग्रेनेड दिसला. यानंतर या मुलांनी याबाबत गावातील नागरिकांना सांगितलं. ही माहिती उपसरपंच गुलाब पांढरे यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांना माहिती दिली.
पोलीस पाटील यांनी जत पोलीस यांना कळवल्यानंतर लगेच पोलीस पथक व सांगलीतील बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, याआधी 2017 ला अशीच घटना कुडनूरमध्ये दोन बॉम्ब सापडले होते. बॉम्बशोधक पथक आणि त्यांची टीम लिओ डॉग हे दाखल झाले होते. सध्या बॉम्बशोधक पथक हॅन्ड ग्रेनेड ताब्यात घेऊन अधिक माहिती घेण्यासाठी सांगलीला रवाना झाले आहेत. त्यामुळे डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व खळबळ माजली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: