एक्स्प्लोर

RTMNU : अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग; विद्यार्थ्यांची होणारी 'अतिरिक्त शुल्क लूट' थांबणार

नोटबंदीनंतर सर्वांनी डिजीटल पेमेंट स्विकारण्यास सुरुवात केली. मात्र देशाचे भविष्य घडविणाऱ्या नागपूर विद्यापीठाने मात्र एवढे वर्ष उलटून आता आपल्या शुल्क स्विकारण्याच्या पद्धतीमध्ये अपग्रेडेशन केले आहे.

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांद्वारे परीक्षा शुल्कासह सर्व्हिस चार्जच्या नावावर कार्यालयातील बाबू 100 ते 150 रुपये प्रति अर्ज अतिरिक्त घेत होते. ज्यांना एटीकेटीचे किंवा बाह्य विद्यार्थी म्हणून अर्ज भरायचा आहे. त्यांना तर हे शुल्क जादा द्यावे लागत असे. मात्र आता विद्यापीठाचे शुल्क ऑनलाइन भरण्याच्या सुविधेमुळे ही वसूली थांबणार असल्याची आशा आहे.

नोटबंदीनंतर साधारण पाणीपुरी वाल्यांपासून तर हॉटेल सर्वांनी पेटीएम, फोन पे, गुगल पे आदींद्वारे पैसे स्विकारण्यास सुरुवात केली. मात्र देशाचे भविष्य घडविणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तर परीक्षा शुल्क, हॉस्टेल फी आदी पैसे भरण्यासाठी कॅम्पसमध्येच जावे लागते. याठिकाणीही विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. खिडकीवरील कर्मचाऱ्याचा लंच ब्रेक नेहमीच थोडासा लाबत असते. तरी विद्यार्थ्यांना नाईलाजाने उभे राहावे लागत होते.

दुसरीकडे खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कही महाविद्यालयातच जमा करावे लागत होते. महाविद्यालयाद्वारे डीडी तयार करून विद्यापीठाकडे पाठविण्यात येतो. मात्र, यात अनेक महाविद्यालये विलंब शुल्काच्या नावाखाली आणि 'सर्व्हिस चार्ज' च्या नावाखाली अतिरिक्त शुल्क घेतात आणि नियमित शुल्क विद्यापीठाकडे भरतात. याशिवाय कोरोनाच्या काळात परीक्षा शुल्क माफ करूनही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केले होते. अशा तक्रारी आल्या होत्या. याबाबत सिनेटमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाने यंदा सुधारात्मक पाऊल उचलत सर्व महाविद्यालयांना प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाव नोंदणी आणि परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय महाविद्यालयांना केवळ विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील शुल्क घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची सुविधा राहील.

योजना थंडबस्त्यात का?

विद्यापीठाने प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक बदल केले. तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र, विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया ऑफलाइनप्रमाणेच राहिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयात शुल्क रोखीने भरावे लागत होते. त्यानंतर महाविद्यालयाकडून ही रक्कम विद्यापीठात जमा करण्यात येते. नोटबंदीनंतर केंद्र सरकारने 'कॅशलेस' प्रणालीला प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन फी भरण्याची सुविधा देण्याचे आदेशही युजीसीने विद्यापीठाला दिले. मात्र, एवढ्या वर्षात विद्यापीठाला विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा सुरू करता आली नाही. आता विद्यापीठाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कॅश काऊंटरवरही 'चिल्लर लूट'

विद्यापीठ कॅम्पसमध्ये असलेल्या कॅश काऊंटरवरील कर्मचारी फक्त रोख रक्कम स्विकारतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कार्ड अथवा बारकोडद्वारे पेमेंट स्विकारण्यात येत नाही. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा, हॉस्टेल, नोंदणी आदी शुल्क हे राऊंड ऑफ नसल्याने 2-3 रुपये चिल्लर लागत अशते. मात्र काऊंटरवर असलेल्या कर्मचाऱ्याकडून पैसे कमी असले तर स्विकारण्यात येत नाही आणि पैसे जास्त दिले तर चिल्लरसाठी 15-20 मिनिटांच्यावर उभे ठेवण्यात येते. आधी रांगेत लागून वैतागलेले विद्यार्थी ती चिल्लर रक्कम न घेताच निघून जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच येथे ही कॅश आणि बारकोडद्वारे रक्कम स्विकारावी अशी मागणीही केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget